google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कायद्याचा रक्षकच झाला खंडणीखोर ! सायबर क्राईमचा अभ्यास करून ३०० कोटीच्या क्रिप्टो करन्सीसाठी केले अपहरण !

Breaking News

कायद्याचा रक्षकच झाला खंडणीखोर ! सायबर क्राईमचा अभ्यास करून ३०० कोटीच्या क्रिप्टो करन्सीसाठी केले अपहरण !

 कायद्याचा रक्षकच झाला खंडणीखोर ! सायबर क्राईमचा अभ्यास करून ३०० कोटीच्या क्रिप्टो करन्सीसाठी केले अपहरण ! 



सायबर गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा फायदा पोलिसांनी सायबर गुन्हे करणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी करावा अशी अपेक्षा असते . परंतू पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात काम करणाऱ्या एका पोलिस शिपायाने या ज्ञानाचा फायदा घेऊन 


एका व्यक्तीकडे ३०० कोटीची क्रिप्टोकरन्सी असल्याची माहिती मिळवली. ऐवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्या व्यक्तीचे अपहरण करून ही क्रिप्टोकरन्सी खंडणी म्हणून मागितली. आतापर्यंत सोने, चांदी, रोख पैशाच्या लुटीच्या घटना समोर आल्या होत्या. पण क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल चलनाची लूट करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा.


या गुन्ह्यामध्ये पोलिस शिपायाचा असलेला समावेशदेखील मोठी चिंतेची बाब आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील एक पोलिसाने दुसऱ्या पोलिसाचा खून करणाऱ्याची सुपारी दिल्याची एक घटना समोर आली होती, तर दुसऱ्या एका घटनेत अवैध व्यावसायिकांशी व्हाटसएपव्दारे संपर्कात राहणाऱ्या एका पोलिसाचे निलंबन करण्यात आले होते.

पोलिस शिपायांमधील गुन्हेगारीकरणाचे हे वाढते प्रकार हीदेखील मोठी गंभीर बाब आहे.


ताज्या घटनेत विनय सुंदरराव नाईक यांचे ताथवडे येथील हॉटेल समाधान येथून अपहरण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केल्याने आरोपींनी विनय नाईक यांना वाकड परिसरात सोडून दिले.


विनय नाईक यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना बिटकॉईन आणि ८ लाखाच्या खंडणीची मागणी झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने माग काढून काही आरोपींना अटक केली. त्यावेळी या सगळ्या प्रकरणाचे सुत्रधार प्रदिप काटे आणि दिलीप खंदारे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदिप काटे याला ताब्यात घेतल्यावर या सगळ्याचा सूत्रधार दिलीप खंदारे असल्याचे पोलिसांना कळाले. त्यांनी दिलीप खंदारे याला भोसरी परिसरातून ताब्यात घेतले.


हा दिलीप खंदारे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून सध्या कामावर गैरहजर आहे. येथे काम करीत असताना त्याने कामाचा भाग म्हणून सायबर गुन्ह्याशी संबंधित विषयाचे विविध कोर्सेस केले. पुणे येथे सायबर क्राईम विभागात काम करत असताना त्याला ताथवडे येथील विनय नाईक यांच्याकडे ३०० कोटी रुपयांची बिट कॉईन करन्सी असल्याची माहिती मिळाली होती.


त्यामुळे त्याने विनय नाईक याचे अपहरण करून खुप पैसे व क्रिप्टो करन्सी मिळविण्याचा कट रचला.


या प्रकरणी दिलीप खंदारेसह सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना आता पोलीस कोठडी सुनावली आहे

Post a Comment

0 Comments