google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरवासीयांसाठी सातबारा उतारा होणार का बंद ? ​

Breaking News

शहरवासीयांसाठी सातबारा उतारा होणार का बंद ? ​

 शहरवासीयांसाठी सातबारा उतारा होणार का बंद ? 


     आपण सातबारा विषयी नेहमी ऐकतो आणि वाचतो पण आता शहरवासियांसाठी तरी सातबारा उतारा कालबाह्य होणार आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सुरू आहेत. 


अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे.  त्यामुळे पुणे शहरासह राज्यातील अनेक शहरात जमिनींच्या 


खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे  त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रायोगिक तत्वावर हवेली तालुक्यात माहिती जमा करण्याचे काम सुरु करणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली. 


👉 काय असते प्रॉपर्टी कार्ड ?


     बिगर शेतजमीन असलेल्या विभागात स्थावर मिळकत म्हणजेच जमीनजुमला किंवा मालमत्तेची शासनाच्या भूमापन विभागाच्या दप्तरी असलेली नोंद तसेच कायदेशीर व अधिकृत मालकी व क्षेत्रफळ दर्शविणारा व नगर भूमापन अधिकाऱ्याच्या सही व शिक्कय़ासहित देण्यात येणारा शासकीय दस्तऐवज म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड. 


     महानगरपालिकेच्या हद्दीत जमीन होती, त्या सर्व मिळकतीचे महानगरपालिकेने प्रॉपर्टी कार्ड तयार केलेले आहे. तसेच अजून सातबारा उतारे बंद करण्यात आलेले नाही. त्यामळे कधीकधी खरेदी विक्री करताना सातबारे उतारे चा वापर केला जातो.


    आता लवकरच सर्व सातबारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड चालू करण्यात येणार आहे. जेव्हा तुम्ही भविष्यात प्रॉपर्टी खरेदी करतान तेव्हा प्रॉपर्टी काडी हेच एक मालमत्ते संदर्भात तपासले जाणारे एक रेकॉर्ड राहील. प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांची फसवणूक होणार नाही, कारण प्रॉपर्टी कार्डवर मिळकतीचे सविस्तर वर्णन, क्षेत्राची नोंद, जमिनीचा नकाशा असल्याने  गैरप्रकार होणार नाही.


     जेव्हा ही मोजणी करतात तेव्हा मोजणी नकाशात स्वतः व्यक्तीशी उपस्थित राहून तयार करण्यात आलेल्या जागेची मोजमाप व सीमारेषा निश्चित करणाऱ्या कागदपत्रावर उपस्थित अर्जदार व अन्य पक्षकार आहेत त्यांच्या सह्या घेतल्या जातात. 


जमिनीची मोजणी ने   सीमारेषा दर्शवणाऱ्या मोजमाप होते, सीमारेषा दर्शवणारा आराखडा तयार होतो, आणि कार्यालयातील सदरहू जागेसंबंधी दप्तरातील नोंदी तपासून मगच दप्तरातील नोंदीत आवश्यक ते फेरफार नगर भूमापन अधिकारी करीत असतो.    मंग  स्थावर मिळकतीचा नगर भूमापन क्रमांकाची विभागणी करण्यात येते. 


जर तुमची एकत्रित मिळकत असेल आणि त्याचा क्रमांक 10 असेल तर विभाग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगर भूमापन क्रमांक 10-अ  किंवा 10-ब असा दिला जाईल व त्यानंतर अर्जदारास स्वतः मिळकतीच्या सुधारित नगर भूमापन क्रमांकाच्या नोंदीची मिळकत पत्रिका नगर भूमापन कार्यालयात रितसर अर्ज करून प्राप्त करण्यात येईल.


     सातबाऱ्यामुळे होणारे फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सिटी सर्व्हे झाला असेल तर सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्‍यक आहे. तरीसुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत. 


तर शेत जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतर झाले आहे, अशा जमिनींचा सातबारा उतार बंद होऊ तेथे प्रॉपर्टी कार्ड सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच सिटी सर्व्हे झाला आहे, परंतु सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डदेखील नाही, अशाही काही जमिनी आहेत. त्यातून अनेक घोळ निर्माण होऊ न्यायालयीन दाव्यांची संख्याही वाढत आहे. 


या सर्व प्रकारांना आळा घालणे आणि त्यामध्ये सुसूत्रता आणणे या हेतूने भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एनसआयसीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संगणक प्रणालीतून हे अशा सर्व जमिनींची माहिती जमा केली जाणार आहे. 


सातबारा उतारा हद्दपार होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड

हद्दीतील प्रत्येक मिळकतीची हद्द होणार निश्‍चित

मिळकतीच्या बेकायदा खरेदी-विक्रीला बसणार आळा

मिळकतदारांना सुलभरीत्या मिळणार कर्ज

अतिक्रमणे काढणे होणार शक्‍य

फसवणुकीला आळा बसणार

घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Post a Comment

0 Comments