google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जगभरात गॕसची मोठी टंचाई झाल्याचा परिणाम. भारतात घरगुती गॅसच्या किंमती वाढणार?

Breaking News

जगभरात गॕसची मोठी टंचाई झाल्याचा परिणाम. भारतात घरगुती गॅसच्या किंमती वाढणार?

 जगभरात गॕसची मोठी टंचाई झाल्याचा परिणाम. भारतात घरगुती गॅसच्या किंमती वाढणार?

जगभरामध्ये गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम आता भारत देशामध्ये एप्रिलमध्ये दिसून येणार आहे. यामुळे देशात गॅसच्या किमतीमध्ये दुपटीने वाढू शकणार आहे. यामुळे सीएनजी , पीएनजी आणि विजेच्या किमती वाढणार आहेत. याबरोबरच सरकारच्या खत अनुदानाच्या बिलामध्ये देखील वाढ होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या कहर मधून बाहेर येत आहे आणि त्याबरोबरच ऊर्जेची मागणी देखील वाढत आहे. परंतु, २०२१ मध्ये त्याचा पुरवठा वाढवण्याकरिता पुरेशी पावले उचलली गेली नाहीत.


या कारणाने गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आयातित एलएनजी करिता घरगुती उद्योग अगोदरच जास्त किंमत देत आहेत. हे दीर्घकालीन करारांमुळे आहे जेथे किंमत कच्च्या तेलाशी जोडली जात आहेत. अनेक महिन्यांपासून भाव भडकत असलेल्या स्पॉट मार्केट मधून त्यांनी खरेदी कमी केली आहे. एप्रिलमध्ये घरगुती गॅसची किंमत वाढू शकणार आहे. पण त्याचा परिणाम एप्रिलमध्ये दिसून येणार आहे. जेव्हा सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत बदल करणार आहे.


उद्योग तज्ञ आणि विश्लेषक म्हणतात की ते $२.९ प्रति एमएमबीटीयू वरून $६-७ पर्यंत वाढवले ​​जाणार असल्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या म्हणण्यानुसार, खोल समुद्रातून बाहेर पडणाऱ्या गॅसची किंमत $६.१३ वरून सुमारे $१० पर्यंत वाढणार आहे. कंपनीमध्ये पुढील महिन्यात काही गॅसचा लिलाव करणार आहे. याकरिता, त्याने कच्च्या तेलाच्या फ्लोअर प्राइसशी जोडले आहे. जी सध्या $१४ प्रति एमएमबीटीयू आहे

Post a Comment

0 Comments