राष्ट्रवादीच्या मेळाव्याला अलोट गर्दी, नेत्यांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मेळाव्याला अलोट गर्दी जमविने महागात पडले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाळे येथे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असून यासाठी प्रधाने व इतर चार असे एकूण पाच जणांनी याने पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. पोलीस प्रशासनाने फक्त ५० जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली होती.पण सोमवारी सायंकाळी मात्र बाळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी
जमविल्याप्रकरणी बिज्जु प्रधाने, सुभाष डांगे, मारुती तोडकर, नागनाथ क्षीरसागर, मदन क्षीरसागर यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रात्री ८ वाजता बाळे येथे राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. परंतु, जयंत पाटील यांचा मोहोळमधील कार्यक्रम रात्री पावणे दहाच्या सुमाराला संपला.
यानंतर ते अनगर येथे भोजनासाठी गेले. रात्री १० वाजले तरी बाळे येथील मंचावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणे सुरूच होती. कितीही उशीर होऊ द्या. मी कार्यक्रमाला येणारच असा निरोप जयंत पाटील यांनी पाठविल्याचे मंचावरुन सांगण्यात येत होते. रात्री १२ वाजता जयंत पाटील यांचे बाळे येथे आगमन झाले रात्री १२ वाजता डिजेवर राष्ट्रवादीचे गाणे वाजविण्यात आले. सव्वा बाराच्या सुमाराला भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नेत्यांची भाषणे झाली.

0 Comments