google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार

Breaking News

महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार

 महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार

प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्यावतीनं देण्यात येणारे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉईंट फाऊंडेशनकडून 2022 साठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. फाऊंडेनशनने एकूण 11 खासदारांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. 


सुप्रिया सुळे , श्रीरंग बारणे, फौजिया खान आणि हिना गावीत यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि रिवॉल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी सलग सातव्यांदा या पुरस्कारावरं नाव कोरलं आहे. सुप्रिया सुळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ट्विटकरुन अभिनंदन केलं आहे.


माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा  पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. गेल्या 12 वर्षापासून लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खासदारांना फाऊंडेशनतर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो. 


संसदेतील अधिकवेशनातील खासदारांची खासदारांची उपस्थिती, चर्चासत्रातील सहभाग, खासगी विधेयके आणि सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. विद्यमान सतराव्या लोकसभेमध्ये पदार्पणातच खा.डॉ.अमोल कोल्हे यांना पहिला संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments