google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओ दाखवून मामीने भाच्यावर केले लैंगिक अत्याचार

Breaking News

धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओ दाखवून मामीने भाच्यावर केले लैंगिक अत्याचार

 धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओ दाखवून मामीने भाच्यावर केले लैंगिक अत्याचार

नागपूर : - नागपूरमध्ये मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी मामीने आपल्या अल्पवयीन भाच्याचे लैंगिक शोषण करून त्याच्यावर अत्याचार केले आहेत.


हि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीवरून 21 वर्षीय मामीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित मुलगा दहावीच्या वर्गात शिकतो. या मुलाचे वडील मोलमजुरीचे काम करतात. दोन वर्षांआधी पीडित मुलगा आपल्या मामाकडे गेला, तेव्हा मामीने पीडित भाच्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याचे पहिल्यांदा लैंगिक शोषण केले. हि आरोपी मामी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने या घटनेचे स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरणसुद्धा केले. त्यानंतर पीडित मुलगा हा आपल्या घरी परतला. यानंतर या मामीने पीडित भाच्याशी मोबाइलवर संपर्क साधून त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पीडित मुलाला वारंवार घरी बोलावून त्याचे लैंगिक शोषण केले.


चार महिन्यांपूर्वीच आरोपी मामीचा पतीसोबत वाद झाला तेव्हा ती आपल्या माहेरी राहायला गेली. त्या ठिकाणीसुद्धा मामीने आपल्या भाच्याला बोलून त्याचे वारंवार लैंगिक शोषण केले. यानंतर हा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलाने आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.


 यानंतर पीडित मुलाच्या नातेवाईकांनी पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलाच्या तक्रारीवरून ठार मारण्याची धमकी देणे व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधककायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पारशिवनी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments