वहिनीवरील प्रेमासाठी पत्नीची क्रूरपणे हत्या ; अंगणातच मृतदेहाचे तुकडे तुकडे केले ...
बिहारमधील मीरगंज पोलीस ठाणे हद्दीतील काशी समइल गावात एका व्यक्तीने आपल्या वहिनीसोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी केवळ हत्या करून थांबला नाही तर त्याने धारदार हत्याराने पत्नीच्या मृतदेहाचा तुकडे तुकडे केले. मृत महिलेचं नाव संजू देवी आहे.
हत्येचा प्रकार लपवण्यासाठी पतीने धारदार तलवारीने पत्नीच्या मृतदेहाचा अनेक तुकडे केले. आणि लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे.हत्येनंतर आरोपी पतीसह अन्य सदस्यही फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फुलवरिया पोलीस ठाणे हद्दीत राहणारी संजू देवीचं लग्न मीरगंज येथील विजय गोंडसोबत झालं होतं.
मृत महिलेला दोन मुलंही आहेत. मात्र पतीचे त्याच्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. संजू अनेकदा याचा विरोध करीत होती. मात्र पती वहिनीविरोधात एकही शब्द ऐकून घेत नव्हता. तो वारंवार पत्नीला मारहाण करीत होता. यामुळे संजू रागाच्या भरात माहेरी निघून गेली.माहेराहून पत्नीला बोलावून केली हत्या...
25 फेब्रुवारी रोजी संजू आपल्या माहेराहून सासरी आली. त्याच रात्री पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या संजू देवीवर पतीने तलवारीने वार केले. त्याने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. यानंतर तो वहिनीसोबत मिळून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करू लागला.
त्याचवेळी मुलीच्या माहेरच्यांना याबाबत कळालं. पोलीस घरी पोहोचले तर अंगणात रक्त सांडलं होतं. आरोपी आणि त्याच्या वहिनीसह संपूर्ण कुटुंब घर सोडून फरार झालं होतं. आता पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरोधात तक्रार दाखल करीत अटकेसाठी छापेमारी सुरू केली आहे.

0 Comments