माढा मतदार संघातील विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत
विदेश मंत्री जयशंकरजी यांच्याकडे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची शिफारस
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील 4, पंढरपूर 5, माढा 1, मंगळवेढा 4, सोलापुर 2, बार्शी 1, व मोहळ 1 विद्यार्थी असे एकुण माढा मतदारसंघातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी त्यांची शिफारस विदेश मंत्री जयशंकरजी यांच्याकडे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. शक्य तितक्या लवकर या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
युक्रेन आणी रशियाच्या युद्धामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्थितीमुळे सध्या शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या विविध भागांमध्ये अडकले आहेत. युक्रेन मधील भारतीय दूतवासाने या विद्यार्थ्यांना सीमेवर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. तेथून त्यांना बाहेर काढले जाऊ शकते, परंतु वाहतूक उपलब्ध नाही आणि मार्गावर कडक तपासणीमुळे ते जवळच्या सीमेवर वर पोहोचू शकत नाहीत. यासंदर्भात माढा मतदारसंघातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी त्यांची शिफारस विदेश मंत्री जयशंकरजी यांच्याकडे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. शक्य तितक्या लवकर या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना माय भूमीत परत
आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून खासदार निंबाळकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासह माढा मतदार संघातील इतर विद्यार्थी व नागरिक आणीबाणीच्या काळामध्ये अडकले असतील तर त्यांनी तात्काळ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments