google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलिसांच्या सतर्कतेमुळे , मुलीला पळवून नेण्याचा फसला प्रयत्न ; परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल !

Breaking News

सांगोला पोलिसांच्या सतर्कतेमुळे , मुलीला पळवून नेण्याचा फसला प्रयत्न ; परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल !

 सांगोला पोलिसांच्या सतर्कतेमुळे , मुलीला पळवून नेण्याचा फसला प्रयत्न ; परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल !


गवंडीकाम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून रेल्वेत बसवून पुढे पाठविला . मात्र , नातेवाईकांच्या संशयातून दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पळवून नेलेल्या मुलीस अवघ्या तीन तासांत मिरज रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले . व त्या मुलीस पळवून नेहणा-या परप्रांतीय तरुणावर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 


मुलगी सापडल्याचे समजताच नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले , सांगोला पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्या गावासह नातेवाईकांतून पोलिसांचे कौतुक होत आहे . हा प्रकार काल शुक्रवारी सांगोला तालुक्यातील एका गावात घडला . सांगोला तालुक्यातील एका गावात घराचे बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने त्याच बांधकामासमोरील घरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवरून पंढरपूरला नेले . व त्या मुलीला कुर्डुवाडी - मिरज पॅसेंजर रेल्वेमध्ये बसवून मिरज रेल्वेस्थानकावर उतरण्यास सांगितले . 


आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तो पुन्हा गावी परत आला , परंतु मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर संशय व्यक्त करून त्यास सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले . सुरुवातीला तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता.


 मात्र नंतर तो आपणच पंढरपुर येथून मिरज रेल्वेत बसवून मुलीला पाठवून दिल्याचे सांगितले . यावेळी पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगोला रेल्वे स्टेशन मास्तरसह मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधून कुर्डुवाडी मिरज रेल्वे कोणत्या स्थानकापर्यंत गेली याची अचूक माहिती घेऊन पोलिस अधिकारी , कर्मचाऱ्यांनी सरकारी गाडीतून तत्काळ मिरज रेल्वे स्टेशनला रवाना केले . सुदैवाने रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी त्या अल्पवयीन मुलीला रेल्वेतून उतरताच ताब्यात घेतले.


अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन सांगोला पोलिस स्टेशनला आणले . पोलिस स्टेशनला कायदेशीर बाबीची पूर्तता करून मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर , पोलिस हवालदार दत्ता वजाळे , पोलिस नाईक अभिजित मोहोळकर , पोलिस नाईक राहुल देवकाते , पोलिस नाईक दीपक भोसले , पोलिस कॉन्स्टेबल  पाटील , धुळा चोरमले , चालक सुनील लोंढे , यांनी केली .

Post a Comment

0 Comments