google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अजितदादा सोलापूर झेडपीवर जाम खुश | "दिलीप स्वामी" तुम्ही जिल्हा व राज्यासाठी अभिमान वाढवण्याचे काम केले

Breaking News

अजितदादा सोलापूर झेडपीवर जाम खुश | "दिलीप स्वामी" तुम्ही जिल्हा व राज्यासाठी अभिमान वाढवण्याचे काम केले

 अजितदादा सोलापूर झेडपीवर जाम खुश | "दिलीप स्वामी" तुम्ही जिल्हा व राज्यासाठी अभिमान वाढवण्याचे काम केले


सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या स्वच्छ व सुंदर या उपक्रमात सहभागी शाळांना जिल्हास्तरीय पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सन्मानित केले, हा कार्यक्रम ऑनलाइन झाला. 


या कार्यक्रमाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, विरोधी पक्षनेते काका साठे, सभापती अनिल मोटे, सदस्य वसंतराव देशमुख, भारत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी किरण लोहार, इशाधिन शेलकंदे, जावेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.


अजित पवार म्हणाले, दोन वर्षे कोरोना मुळे मुले शाळेत गेली नाहीत, मात्र ही मुलं चांगल्या,स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावीत यासाठी तुम्ही स्वच्छ व सुंदर अभियान राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहे, हे अभियान मी पुणे जिल्हा व राज्यात राबविण्यासाठी सूचना करतो, पावणे सात कोटी लोकवर्गणीतून जमा करणे येड्या गबाळ्याचे काम नाही मात्र स्वामी व तुमच्या टीमने हे काम केले, पावणे तीन हजार शाळा स्वच्छ व सुंदर केल्या. हे जिल्हा व राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र यात सातत्य ठेवा अशी सक्त सूचना करत त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शनिवारी अजित पवारांनी सिईओ स्वामी यांना दिल्या. आपल्या 13 मिनिटांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकरा वेळा दिलीप स्वामी यांचे नाव घेतले. पहा अजितदादा काय म्हणाले.


पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेने अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले, त्याच पद्धतीने स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात अभिनव पध्दतीने राबविला. माझे गाव कोरोनामुक्त गाव हा उपक्रम राज्यात दखल घेण्यात आली. 


अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना सारख्या महामारी परिस्थितीमध्येही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने अतिशय चांगले काम केले, स्वच्छ व सुंदर शाळा केल्या त्यामुळे अध्यक्ष असल्याचा अभिमान वाटतो.


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले सीईओ स्वामी यांच्या पायाला दोन चाके लागली आहेत, कायम ते फिरत राहतात, विविध उपक्रम राबवतात, त्यामुळेच स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले. त्यांच्या या यशामध्ये शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक यांचाही महत्त्वाचा वाटा आहे आता यामध्ये सातत्य राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी सीईओ स्वामी यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वच्छ व सुंदर शाळा अभियान राबविण्यामागील उद्देश सांगताना जिल्ह्यात राबविलेल्या इतर उपक्रमांची माहिती दिली...


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्ताराधिकारी गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी सर्व विस्ताराधिकारी सर्व कर्मचारी माहिती व तंत्रज्ञान विभागाची टीम यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments