google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वात मोठी बातमी..! संभाजीराजेंनी उपोषण सोडलं;

Breaking News

सर्वात मोठी बातमी..! संभाजीराजेंनी उपोषण सोडलं;

 सर्वात मोठी बातमी..! संभाजीराजेंनी उपोषण सोडलं; 



महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य.मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर गेली 3 दिवस सुरू असलेलं उपोषण खासदार संभाजीराजे छत्रपतींनी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन सोडलं आहे. खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली.


त्यावेळी लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती.त्यानंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान त्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments