google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 81 प्रकरणे मंजूर ; जयमालाताई गायकवाड

Breaking News

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 81 प्रकरणे मंजूर ; जयमालाताई गायकवाड

 संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 81 प्रकरणे मंजूर ; जयमालाताई गायकवाड 




सांगोला : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील निराधार विधवा तसेच उपेक्षित वंचित लोकांना शासकीय आर्थिक अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात आली असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेची पहिलीच बैठक सोमवार दि 28 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे संपन्न झाली. समितीच्या या पहिल्याच बैठकीत एकूण 122 प्रकरणांपैकी तब्बल 81 प्रकरणे मंजूर झाली असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षा जयमलाताई गायकवाड यांनी दिली.


सोमवार दि 28 रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे झालेल्या बैठकीस समितीच्या अध्यक्षा जयमलाताई गायकवाड, सचिव तथा तहसीलदार अभिजीत पाटील, प्रा. संजय देशमुख, शिवाजी कोळेकर, चंद्रकांत कारंडे, विजय पवार, दादासाहेब वाघमोडे, विलास पाटील व पंकज काटे आदी समितीचे सदस्य उपस्थित होते. 


पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी समिती गठित केल्यापासून ही पहिलीच बैठक होती पहिल्याच बैठकीत बहुतांशी प्रकरणे मंजूर केल्याने पात्र लाभार्थ्यामधून समाधान व्यक्त होत आहे. समितीच्या पहिल्याच बैठकीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची आर्थिक आर्थिक उत्पन्नाची अट ही २१ हजाराहून ५० हजार करावी असा ठराव करण्यात आला. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराचे वार्षिक आर्थिक उत्पन्न २१ हजाराहून अधिक होत


 असल्याने समितीने पहिल्याच बैठकीत हा अभ्यासपूर्ण निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समितीच अस्तित्वात नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित होती अनेक पात्र लाभार्थी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु पहिल्याच बैठकीत बहुतांश प्रकरणे मंजूर केल्याने या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे.


संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, व इंदिरा गांधी वृद्धापकाळ अनुदान योजना या सर्व अनुदान योजना साठी 122 प्रकरणे दाखल करण्यात आली होती यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून 48 श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेतून 30 व इंदिरा गांधी वृद्धापकाळ अनुदान योजनेतून 3 अशी एकूण 81 प्रकरणे पहिल्याच बैठकीत मंजूर करण्यात आली आहेत 


सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन तहसील कार्यालयात जमा करावे आगामी काळात या योजनांचे आर्थिक अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होईल असेही समितीच्या अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी सांगितले. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच येणार आपल्या दारी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना आता सांगोला येथे येण्याची गरज उरली नाही. 


तालुक्यातील प्रत्येक मंडलमध्ये या योजनेचे तहसीलदारांसह गटविकास अधिकारी सर्व शासकीय अधिकारी व सेतूतील अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून समितीची बैठक घेणार आहेत. यामध्ये लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका तसेच सर्व प्रकारचे दाखले प्रमाणपत्र काढून देण्याची सोय करण्यात येईल. 7 मार्च रोजी जवळा येथे दिवसभर घेरडी, सोनंद व जवळा मंडल मधील पात्र लाभार्थ्यांसाठी पहिला कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. 


यामध्ये योजनेचा लाभ मिळवण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे. तालुक्यातील प्रत्येक मंडलमध्ये असे कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. निराधारांना आधार व मदतीचा हात देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समितीच पात्र लाभार्थ्यांच्या दारी घेऊन जाणार आहोत ;

सौ जयमालाताई गायकवाड

अध्यक्षा, संजय गांधी निराधार अनुदान योजना.

Post a Comment

0 Comments