सांगोला शहरात वहातुकीची कोंडी ; ट्रॅफिक पोलीस वहातुक नियंत्रणासाठी आहेत का ? वाटमारीसाठी ? ; नागरिकांचा संतप्त सवाल
सांगोला /तालुका प्रतिनिधी ;- सांगोला शहरातील मिरजरोड वरील रेल्वे गेट रस्त्या भुयारी मार्गासाठी काही महिने बंद राहणार आहे. त्यामुळे सांगोला शहरात एखतपूर , महुद , शिरभावी , पंढरपूर , मंगळवेढा , जत , मिरज या सर्व रोडवरील वहातुक शहरातील वाढेगाव नाका ते महुद रेल्वे गेट मार्गाने वळवल्याने या ठिकाणी वहातुकीची मोठी कोंडी होताना दिसत आहे. शिवाय सांगोला शहरातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या शाळा , कॉलेज मधील विध्यार्थी , विध्यार्थ्यांनी याच रस्त्याने आपापल्या दुचाकी वरून प्रवास करत असतात आणि महुद रोडवरील रेल्वे गेट पडल्यावर या रस्त्यावर दुचाकी , चारचाकी , व अवजड वहानांच्या लांबच लांब राग लागते आणि वहातुकीची मोठी कोंडी निर्माण होते.
त्यात रस्त्याच्या कडेला विनाकारण उभ्या केलेल्या वहानांची भर पडते. शासकीय कामानिमित्त आपल्या दुचाकी , चारचाकी गाड्या घेवून आलेल्या नागरिकांना कोणत्याही ठिकाणी पार्किंग ची सोय नसल्याने ती वहाने रस्त्याच्या कडेला उभी करतात .यामुळे वारंवार वहातुकीची कोंडी निर्माण होते.
या वहातुक कोंडीमध्ये आपापली वहाने पुढे काढण्यासाठी वहान चालकामध्ये चढावड होते . त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिरज रोडवरील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम काही महिने चालणार आहे. त्यामुळे प्रमुखांने वाढेगाव नाका ते महुद रेल्वे गेट रस्त्यावर वहातुकीची मोठी कोंडी होणार आहे .
या रस्त्यावरच्या वहातुक कोंडी कडे ट्रॅफिक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वहातुकीचे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे ट्रॅफिक पोलीस मात्र शहरातील विविध ठिकाणी वाटमारी करतानाच दिसत आहेत. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस वहातुक नियंत्रणासाठी आहेत की वाटमारीसाठी ? असा संतप्त सवाल नागरिकांमधुन विचारला जात आहे.

0 Comments