google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड. जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकारिणी केली जाहीर.

Breaking News

रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड. जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकारिणी केली जाहीर.

 रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

जिल्हाध्यक्ष यांनी  कार्यकारिणी केली जाहीर.



 सांगोला- काँग्रेसचे  नेते रविंद्र कांबळे यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रविंद्र कांबळे हे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.          


      सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या माढा मतदार संघातून स्वर्गीय माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील  यांनी निवडणूक लढवली होती . तेव्हा रविंद्र कांबळे यांनी माढा लोकसभा  मतदार संघामध्ये प्रचाराची धुरा यशस्वीपणे पार पाडली होती. आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे  वेगळी ओळख निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. 

          गेले अनेक वर्षापासून 'जनसेवा संघटनेच्या ' माध्यमातून जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केले आहे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी चांगले काम केले आहे. या सर्व गोष्टीची दखल घेऊन जिल्हाध्यक्षांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारणी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा रविंद्र कांबळे यांचा खांद्यावरती दिली आहे.

             नुतन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ,ऊर्जामंत्री नितीन राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष  आ. प्रणितीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, प्रांतिक सदस्य प्रा. प्रबुद्धचंद्र झपके इत्यादी वरिष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी रात्रीचा दिवस करून प्रयत्नशील राहील व मला दिलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे न्याय देण्याची भूमिका पार पाडेन असे मत व्यक्त केले.


सदर निवडीचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्ष ,संस्था व संघटनांच्या  पदाधिकाऱ्यांनी तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments