google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तालुक्यांमध्ये अवैध धंद्यावर कारवाईंचा धडाका सुरू.. सांगोला तालुक्यात 4 ठिकाणी अवैध देशी दारू विक्री वर सांगोला पोलीसाचा छापा

Breaking News

सांगोला नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तालुक्यांमध्ये अवैध धंद्यावर कारवाईंचा धडाका सुरू.. सांगोला तालुक्यात 4 ठिकाणी अवैध देशी दारू विक्री वर सांगोला पोलीसाचा छापा

 सांगोला नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तालुक्यांमध्ये अवैध धंद्यावर कारवाईंचा धडाका सुरू..


सांगोला तालुक्यात 4 ठिकाणी अवैध देशी दारू विक्री वर सांगोला पोलीसाचा छापा 

सांगोला / प्रतिनिधी सांगोला पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तालुक्यांमध्ये अवैध धंद्यावर कारवाईंचा धडाका सुरू केला आहे . पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सांगोला पोलीसांनी अवैध देशी दारू विक्री वर छापा


 टाकून 3 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करतचार जणांवर कारवाई केली आहे . पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश मेटकरी व सहाय्यक पोलीस फौजदार पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सांगोला तालुक्यातील बेहरे चिंचोली येथे पत्र्याच्या गाळ्याच्या पाठीमागे व भैरवनाथ समाज मंदिराच्या पाठीमागे छापा टाकला


 असता त्या ठिकाणी देशी दारू संत्रा कंपनीच्या 30 बाढल्या असा 1 हजार 800रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून विक्रेते पप्पू वसंत भोसले व विनोद विष्णू भोसले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर , पोलीस हेडकॉन्स्टेबल बनसोडे , पोलीस हेडकॉन्स्टेबल भुजबळ व पोलीस कॉन्स्टेबल सुमित पिसे हे अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी नाझरा दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करत असताना 


बलवडी येथील समाज मंदिराच्या पाठीमागील चिलाटीचा झुडपांमध्ये अवैध देशी दारू विक्री होतअसल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथून देशी दारू संत्रा कंपनीच्या 14 बाटल्या असा 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विक्रेता बालाजी तुकाराम येवले याच्यावर कारवाई करण्यात आली आहे . तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर देसाई , सहाय्यक पोलीस फौजदार बगाडे , पोलीस कॉन्स्टेबल काझी , 


पोलीस नाईक व्हरे हे कोळा दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार जुनोनी येथील अभिलाषाफर्निचर सेंटरच्या जवळच्या बोळात छापा टाकला असता सदर ठिकाणी देशी दारू मंत्रा कंपनीच्या 15 बाटल्या असा 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विक्रेता राजाराम जगन्नाथ श्रीराम याच्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत .

Post a Comment

0 Comments