आनंद हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या मातांची प्रसूती होणार मोफत : डॉ . परेश खंडागळे
सांगोला / प्रतिनिधी : मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने सांगोला शहरातील आनंदहॉस्पिटल यांच्या पुढाकाराने हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या मातांची प्रसूती मोफत केली जात आहे . यामुळे " मुलगी झाली चिंता मिटली " अशी काहीशी म्हण आता अनेक कुटुंबांमधूनउच्चारली जात आहे . यानिमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओ ही चळवळ
आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ . अमर शेंडे , डॉ . परेश खंडागळे , डॉ . स्वाती खंडागळे हे समाजामध्ये योग्यरीत्या रुजवत असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .अत्याधुनिक युगात आजही स्त्रीभ्रूण हत्या करू नका , मुलींनाही जन्म घेऊ द्या , मुलगा आणि मुलगी भेदभाव करू नका अशा अनेक पद्धतीची जनजागृती शासन - प्रशासन यासह अनेक सामाजिक संघटना संस्था करीत आहेत .
मात्र आनंद हॉस्पिटल मुलगी जन्माची एक वेगळी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करीत आहे . कन्यारत्नाचे स्वागत करताना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक झळ बसू नये , प्रत्येक कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत धुमधडाक्यात व्हावे . याकरिता सांगोला शहरातील आनंद हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास कोणताही खर्च घेतला जात नाही . रुग्णालय व नर्सिंग सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे .
डॉ . अमर शेंडे , डॉ . परेश खंडागळे , डॉ . स्वाती खंडागळे हे मागील अनेक वर्षे वैद्यकिय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत . यापूर्वी सुमारे २०० महिलांच्या प्रसूती मोफत केल्या आहेत . परंतू मागील काही कालावधी साठी मुलगी झाल्यास नॉर्मल मोफत प्रसूती हा उपक्रम स्थगित ठेवण्यात आला होता . मात्र मागील आठवड्यापासून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे
. यामध्ये पहिला पेशंट डिस्चार्ज झाला आहे . नॉर्मल प्रसुती करून मोफत मुलीच्या जन्माचे स्वागत आनंद हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे . यापुढील काळात देखील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा . असे आवाहन डॉ . अमर शेंडे , डॉ . परेश खंडागळे , डॉ . स्वाती खंडागळे यांनी केले आहे .

0 Comments