google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हळदी समारंभादरम्यान घडली भयंकर घटना! 13 महिलांचा मृत्यू; लग्नाच्या आनंदावर विरजन!

Breaking News

हळदी समारंभादरम्यान घडली भयंकर घटना! 13 महिलांचा मृत्यू; लग्नाच्या आनंदावर विरजन!

 हळदी समारंभादरम्यान घडली भयंकर घटना! 13 महिलांचा मृत्यू; लग्नाच्या आनंदावर विरजन!

लखनऊ – घरात लग्नसोहळा म्हटलं की पाहुण्यांची लगबग सुरु होते. अशावेळी मेहंदी, संगीत, हळदी-समारंभ या कार्यक्रमांची एक वेगळीच मजा असते. सर्वजण वेळात वेळ काढून या शुभप्रसंगांना हजेरी लावतात. दुसरीकडे, बऱ्याचदा लग्नप्रसंगी किंवा विवाह सोहळ्या दरम्यान घडलेल्या काही दुःखद घटना देखील ऐकायला मिळतात. मात्र, यावेळी अतिशय धक्कादायक घटना लखनऊ मधून समोर आली आहे. या घटनेमुळे आनंदाचं वातावरण क्षणभरात दुःखात बदललं.


नेमकं काय घडलं?


उत्तर प्रदेशातील कुशीनगरच्या नौरंगिया स्कूल टोलामध्ये एक लग्नसमारंभाचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, कालच्या दिवशी म्हणजे बुधवारी याठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. हळदी सोहळा सुरु असताना काही महिला आणि मुली एका विहिरीच्या जाळीवर बसल्या होत्या. अचानक त्यांच्या वजनाने ही जाळी तुटली आणि त्यावरील सर्व महिला आणि मुली एकाच वेळी विहिरीत कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत कळवलं.



या घटनेत एकाच विहिरीत अनेक महिला आणि मुली कोसळल्यामुले गोंधळ उडाला. धक्कादायक म्हणजे तब्बल 13 जणींचा या घटनेत बुडून मृत्यू झाला. यात काही महिला तसेच मुलींचा समावेश आहे. सदर घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथील असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौरंगिया ग्रामसभेच्या स्कूल टोलावर बुधवारी रात्री सुमारे 9 वाजता एका लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान विहिरीची पुजा करण्याच्या प्रथेसाठी महिला आणि मुली एकत्र जमल्या होत्या. ही विहीर पाण्याने भरलेली होती. 


शुभकार्याच्या निमित्ताने गर्दी भरपूर होती. विहिरीच्या जवळ आणि विहिरीवर बांधलेल्या मचाणावर मुली व महिला बसल्या होत्या. मात्र हे मचाण कमकुवत झाल्याने ते भर सहन करू शकलं नाही आणि त्यामुळे हा अपघात झाला, असं म्हटलं जातंय. बुडणाऱ्या महिलांना वाचवण्याच्या नादात इतरही अनेक महिला विहिरीत बुडाल्या.


दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्यात लोक शिडी टाकून विहिरीत उतरताना आणि मदत करतांना दिसत आहे. शिवाय रात्रीची वेळ असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. अक्षरशः टॉर्चच्या उजेडात हे बचावकार्य सुरु होतं.


अपघाताच्या या घटनेबाबत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केलं की, “UPCM श्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात विहिरीत पडून झालेल्या अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बचाव आणि मदतकार्य करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments