महत्वाचं! तुमचंही आधार कार्ड होणार बाद? 'या' प्रकारे करा नवीन आधार डाउनलोड; UIDAI चा नवा निर्णय;
नवी दिल्ली – आधारकार्डच्या संदर्भात एक अतिशय म्हत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही बाजारातून घेतलेलं आधार स्मार्ट कार्ड वापरात असाल तर ते आता वैध ठरणार नाही. कारण, आधार कार्ड सेवा पुरवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने बाजारातून तयार करण्यात येणारे पीव्हीसी कार्ड वैध नसल्याचे म्हटले आहे. अधिकृतरीत्या UIDAI ने जारी केलेलं आधार कार्ड कोणतीही व्यक्ती 50 रुपयांचे शुल्क देऊन मागवू शकते. म्हणजे तुम्ही 50 रुपये भरून आधारच्या सरकारी एजन्सीकडून PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता.
सध्या तुम्ही वापरत असलेल्या स्मार्ट आधारकार्डमध्ये सुरक्षेच्या अनेक त्रुटी असल्याने ते स्वीकारता येणार नाही, असं UIDAI ने जाहीर केलंय. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीमध्ये UIDAI ने म्हटले आहे की, आम्ही हे आधारकार्ड अवैध ठरवत आहोत. कारण, त्यात कोणतेही सुरक्षा वैशिष्ट्य नाही. जर तुम्हाला आधारचे पीव्हीसी कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही 50 रुपये भरून ते अधिकृतरित्या मागवू शकता.
याप्रकारे नवीन आधार डाउनलोड करा
आधार स्मार्ट कार्ड छापले गेले किंवा खुल्या बाजारातून बनवले गेले तर ते वैध ठरणार नाही. त्यामुळे, तुम्ही UIDAI वरून आधार पत्र किंवा आधार डाउनलोड करू शकता. आधार PVC कार्ड हे मुळात डिजिटल स्वाक्षरी असलेला सुरक्षित QR कोड आणि छायाचित्र आहे. त्यात लोकसंख्या शास्त्रीय तपशील देखील आहेत. हे सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. ते UIDAI द्वारे फक्त पोस्टानेच पाठवले जाते.
यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइटची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट देऊ शकता. त्यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.12-अंकी आधार क्रमांक किंवा 28-अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर अटी व शर्ती मान्य करून मोबाईलवर आलेला ओटीपी भरावा. यानंतर तुम्ही सबमिट बटण दाबून ओटीपी व्हेरिफिकेशन करू शकता.या प्रक्रियेनंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला पेमेंट गेटवेवर नेले जाईल आणि तेथे तुम्हाला क्रेडिट, डेबिट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.

0 Comments