google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..पुण्यात पोलिसाने दिली पोलिसाची सुपारी मात्र कुणाला तर ?

Breaking News

खळबळजनक..पुण्यात पोलिसाने दिली पोलिसाची सुपारी मात्र कुणाला तर ?

 खळबळजनक..पुण्यात पोलिसाने दिली पोलिसाची सुपारी मात्र कुणाला तर ?



महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसऱ्या पोलिसाला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप गुन्हा दत्तवाडी पोलिसांनी दाखल केला आहे.



उपलब्ध माहितीनुसार, योगेश प्रल्हाद अडसूळ ( वय 35 राहणार काळेपडळ एकता कॉलनी हडपसर ) या गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल झाल्याचे समजताच नितीन दुधाळ हा फरार झालेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी दत्तवाडी पोलिस ठाणे ही फिर्याद दिली असून नोव्हेंबर 2019 पासून हडपसर आणि दत्तवाडी परिसरात हा प्रकार घडलेला आहे.



पोलीस कर्मचारी नितीन दुधाडे सध्या फरासखाना पोलीस ठाणे येथे कार्यरत असून तो आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी हे शेजारी रहायला होते, त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. आडसुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून नुकताच खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर सुटलेला आहे.



तो पॅरोलवर सुटल्यानंतर दुधाळ याने अडसूळ याची हडपसर येथे भेट घेतली त्यावेळी त्याला सुपारी देऊन पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण अथवा गंभीर दुखापत करण्याचा करण्याची दुधाळ याने सुपारी दिली असल्याचे स्वप्निल लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments