google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 थंडीचा कडाका आणखी वाढणार !

Breaking News

थंडीचा कडाका आणखी वाढणार !

 थंडीचा कडाका आणखी वाढणार !


   राज्यात अनेक ठकाणी पाऊस झाल्याने थंड वातावरण निर्माण झाले असताना येत्या दोन दिवसात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे .


हिवाळा अखेरच्या टप्प्यात आला असताना गावेतील गारवा अधिक वाढत चालला असून तापमानात मोठी घट होत आहे . राज्यातील किमान तापमानात देखील मोठी घट होऊन थंडी वाढत आहे . त्यातच राज्यात अनेक ठकाणी पाऊस पडला असल्याने तापमानात घट होऊन हवेतला गारवा वाढला आहे . 




येत्या दोन दिवसात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे . या थंडीचा सर्वाधिक प्रभाव मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जाणवण्याची उत्तर शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे .


 गुजराथ आणि पाकीस्थान येहून आलेल्या जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या धुळीच्या कणामुळे काल मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता कमी होऊन तो धोकादायक पातळीवर पोहोचला आणि धुलींकणामुळे दृष्यमानता कमी झाली होती . मागील दहा वर्षातील सर्वात कमी तापमानही रविवारी मुंबईत नोंदले गेले आहे . राज्यात किमान तपमानात घट होऊन पुणे , नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्यात सर्वाधिक थंडी जाणवणार 


असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे . काही ठिकाणी तर एक अंकी तपमान नोंदले जाण्याची शक्यता आहे . थंडीमुळे विविध प्रकारे त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असून विशेषतः आजारी तसेच नागरिकांनी विशेष दक्षता वृद्ध घेणे आवश्यक आहे .

Post a Comment

0 Comments