google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - चेतनसिंह केदार-सावंत

Breaking News

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - चेतनसिंह केदार-सावंत

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - चेतनसिंह केदार-सावंत 


सांगोला (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या वतीने सांगोल्यात नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी


 पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी जोरदार टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करत


 मंगळवारी सांगोल्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, काँग्रेसचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकुमशाहीचा आणि कृती परिवाराची सेवा करण्याची आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे विधाने करीत आहेत. नाना पटोले यांचे वक्तव्य लोकशाही प्रक्रियेला काळिमा फासणारे असून 


त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगोला पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले.


यावेळी यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, किसान प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव गायकवाड, भाजपचे जिल्हा सचिव आनंद फाटे, ता. उपाध्यक्ष विजय बाबर, गणेश कदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण जानकर, ग्रा.प.सदस्य विजय ननवरे, वसंत सुपेकर, 


प्रसाद फुले, डॉ. मानस कमलापूरकर, लक्ष्मीकांत लिगाडे, सुरेश इंगोले, संग्राम गायकवाड, राहुल केदार, देविदास कांबळे, सुरेश बुरांडे, ओंकार कुलकर्णी, फैजुद्दीन शेख, दत्ता पवार, जोतिराम माने, औदुंबर केदार, बाळासो चव्हाण, , विनोद उबाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments