google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्टार प्रचारकपदी निवड

Breaking News

आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्टार प्रचारकपदी निवड

 आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्टार प्रचारकपदी निवड



उत्तरप्रदेश निवडणुक करीता कॉंग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रीय स्टार प्रचारक’ म्हणून सोलापूरच्या लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा “आमदार प्रणिती शिंदे” यांची निवड करण्यात आली आहे.


आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्तरावर प्रचारकांच्या यादीत निवड होणे हि बाब आम्हास अत्यंत अभिमानास्पद असुन हा बहुमान मिळाल्याचा अत्यंत आनंद होत आहे. हि निवड कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आदेशावरून संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केली आहे.


लोककल्याणकारी युवाआमदार म्हणून संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रणिती शिंदे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असुन आता राष्ट्रीय स्तरावर याद्वारे आपल्या धडाकेबाज कार्याची चुणूक दाखवण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments