google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठी पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा डॉ . बाबासाहेब | देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न पत्रकार बांधव जनसेवेचा वसा कायम ठेवतील- डॉ . बाबासाहेब देशमुख

Breaking News

मराठी पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा डॉ . बाबासाहेब | देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न पत्रकार बांधव जनसेवेचा वसा कायम ठेवतील- डॉ . बाबासाहेब देशमुख

 मराठी पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा डॉ . बाबासाहेब | देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न पत्रकार बांधव जनसेवेचा वसा कायम ठेवतील- डॉ . बाबासाहेब देशमुख


सांगोला ( प्रतिनिधी ) : - नुकतीच सांगोले तालुक्यातील मराठी पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकान्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत . त्यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणुन मोहन मस्के यांची तर सचिव पदी प्रविण घोंगडे , कार्याध्यक्षपदी राजेंद्र यादव , उपाध्यक्षपदी दिलीप घुले व मिनाज खतीब यांची निवड झाली व काही नामवंत पत्रकारांची सदस्य म्हणुनही नियुक्ती झालेचे समजले . 


तसेच काही दिवसापूर्वी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सतीश सावंत याची निवड झालेचे समजले . सदर निवडी या योग्य व अभिनंदनीय आहेत , असे विचार डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले . लोकशाहीमध्ये पत्रकारीतेला अन्यसाधारण महत्व आहे . ज्यांचे लक्ष कोठे जात नाही त्या प्रश्नांकडे पत्रकार बांधवांचे लक्ष जाते हे लक्षात असावे . 


कीतीतरी प्रश्न व समस्या निदर्शनास आणुन देण्याचे महत्वपुर्ण काम हे पत्रकार बंधु इमानेइतबारे करीत असतात . राजकीय क्षेत्रामध्ये व प्रशासकीय क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्या कामाचे मुल्यमापन करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पत्रकार आपल्या लेखणीतून करीत असतात .


एखाद्यावरती अन्याय होत आसेल किंवा कोणाच्या हातुन कायद्याची पायमल्ली होत आसेल तर | रोखण्याचे महत्वपुर्ण काम आपले पत्रकार बंधु ती करीत असतात . आजही समाजामध्ये पत्रकारांची विश्वासहर्ता कायम टिकुन आहे . आज प्रचारांच्या , प्रसारांच्या अनेक नवनवीन माध्यमाने जन्म घेतला आहे . 


एका क्षणात लोकांना एखाद्या गोष्टींची माहीती घेता येते . एवढी प्रगती या क्षेत्रात झालेली आहे तरीही पत्रकारांच्या वर्तमान पत्रातील बातमीच्या एका ओळीवरती वाचक नागरीक जो विश्वास टाकतात तो आजही जसाच्या तसा कायम टिकून आहे . आपल्या सांगोले तालुक्याचा विचार केला तर तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी केल्याची अनेक उदाहरणे आहेत . 


स्व आबासाहेबांनी तालुक्यात विकासाची कामे करीत असताना , अनेक पत्रकारांशी विचारविनीमय केल्याची अनेक उदाहरणे आहेत . कारण विकास साधायचा आसेल तर सर्वसमावेशक विकास  आसायला हवा त्यासाठी स्व .  आबासाहेब सतत पत्रकारांच्या संपर्कात असत . विशेषता तालुक्यामध्ये सर्वधर्म समभाव रुजावा यासाठी विशेष प्रयत्न 


स्व .  आबासाहेबांनी कायमस्वरुपी केलेत त्याप्रयत्नांना पत्रकार बंधुंचे विशेष सहकार्य लाभले होते . तालुक्यातील विकास कामाबरोबरच सर्व धर्मीयांचे सामाजीक उपक्रम असोत कींवा सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती असोत त्या कार्यक्रमाचे वृतांकन फोटो यांना अशा प्रकारे प्रसिध्द केले गेले की ते राष्ट्रपुरुष कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित न ठेवता


 त्यांचे काम व्यापक व सर्वसमावेषक होण्यासाठीचे महत्वपूर्ण काम पत्रकार बंधुनी केले आहे . अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पत्रकारबंधुचे काम महत्वपुर्ण आहे . येणाऱ्या काळात हीच कामाची पध्दती नुतन मराठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य कायम ठेवतील याची खात्री पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली .

Post a Comment

0 Comments