मंगळवेढा। गुप्तधनाचे आमिष दाखवून फसवणूक, मुख्य सूत्रधार भोंदूबाबा अटकेत
गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित भोंदूबाबा मोहम्मद शेख याला पोलिस उपनिरीक्षक अमोल बामणे यांच्या पथकाने सांगली येथून ताब्यात घेतले.
गुरुवारी रात्री त्यास अटक केली . आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान, त्याने फसवणुकीची रक्कम जुगार, मटका खेळण्यात उधळल्याची माहिती मिळाली आहे. तपासांती त्याचा उलगडा होणार आहे.
लक्ष्मण रामचंद्र माने, (रा.सलगर खुर्द) यांच्या शेतात संशयितांनी १३ जुलै २०२१ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पूजा केली होती. त्यांच्या मेहुण्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले होते.
त्याच्या बदल्यात नकली सोन्याचे दागिने देऊन जीवितास धोका होईल अशी भीती दाखवली होती. तसेच गुप्तधन काढून देण्यासाठी ६१ लाख ७० हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी १ ९ जानेवारी रोजी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

0 Comments