google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सौरऊर्जा कृषीपंप योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची : डॉ. बाबासाहेब देशमुख -

Breaking News

सौरऊर्जा कृषीपंप योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची : डॉ. बाबासाहेब देशमुख -

 सौरऊर्जा कृषीपंप योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची : डॉ. बाबासाहेब देशमुख 



दुर्गम भाग असलेल्या डिकसळ येथील शेतकरी बंडू वाघमोडे यांनी हा यशस्वी प्रयोग आपल्या शेतात करून तालुक्यात नाव कमावले आहे. यांचा आदर्श सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा,असेही डॉ देशमुख यांनी शेवटी सांगितले.



महावितरण कंपनीची मनमानी, अव्वाच्या सव्वा वीजबिले व शेती पंपाच्या विजेची अनिश्चित वेळा यामुळे बळीराजा वैतागला आहे. याला उत्तम पर्याय म्हणून, सौरऊजा प्रकल्प आहे. आज डिकसळमध्ये बंडू वाघमोडे यांनी हा प्रकल्प उभारून,चांगला निर्णय घेतला असून हा प्रकल्प फायदेशीर असल्याचे मत शेकाप पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.




सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे बंडू वाघमोडे यांच्या शेतात मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजने अंतर्गत 5 hp च्या कृषि पंपाचे उद्धाटन डॉ बाबासाहेब देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक तुकाराम भुसनर, संतोष करांडे, काकासाहेब करांडे, संजय वाघमोडे,संदीप करांडे,सोपान करांडे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळींच्या उपस्थित पार पडले.



यावेळी पुढे बोलताना डॉ. देशमुख म्हणाले की,शेतकऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा. आज माझ्यामते हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असेल. यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त 10 टक्के वाटा भरावयाचा असून,उर्वरित रक्कम हे शासन भरीत असते. यासाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. सध्या ही वेबसाईट बंद आहे,पण मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी बोलून,सांगोला तालुक्यातील अधिकाधिक सौर कृषी पंप बसविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.



अगदी दुर्गम भाग असलेल्या डिकसळ येथील शेतकरी बंडू वाघमोडे यांनी हा यशस्वी प्रयोग आपल्या शेतात करून तालुक्यात नाव कमावले आहे. यांचा आदर्श सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा,असेही डॉ देशमुख यांनी शेवटी सांगितले.



प्रारंभी कृषी सौरपंपाच्या पॅनलचे उद्धाटन व कृषी पंपाची कळ दाबून डॉ. देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माणिक करांडे,मनीषा वाघमोडे,अनुसया वाघमोडे, जैंनुद्दिन शेख रामा भुसनर,योगेश करांडे यांच्यासह अन्य ग्रामस्थ ,युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लाभार्थी निवडीचे पात्रता निकष

(३ व ५ अश्वशक्ती ) :

शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.

पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.

५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.

यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.

अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.

वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.

“धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष

(७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता)

विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.



अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.



खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.



कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

Post a Comment

0 Comments