google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार, मात्र विद्यार्थ्यांना सक्ती नाही

Breaking News

राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार, मात्र विद्यार्थ्यांना सक्ती नाही

 राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार, मात्र विद्यार्थ्यांना सक्ती नाही 



कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे मागील २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू होणार आहे. मात्र एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास संबंधित वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


यासंदर्भात टोपे म्हणाले की, शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये कोरोनाची थोडीही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास संबंधित वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.


विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही. जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, हा देखील शाळा सुरू करण्यामागचा हेतू आहे. 


त्यामुळे पालकांनी काळजी न करता कोरोनासंदर्भातील नियम पाळावे, असे आवाहन टोपे यांनी केले. कोरोना लस सक्तीची नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. तर राज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असल्याचे सरकार सांगत आहे. 


यावर बोलताना,लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करून त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया टोपे यांनी दिली आहे. लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments