google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भन्नाट ऑफर ! फक्त ९२६ रूपयात देशात कुठेही करा विमान प्रवास

Breaking News

भन्नाट ऑफर ! फक्त ९२६ रूपयात देशात कुठेही करा विमान प्रवास

 भन्नाट ऑफर ! फक्त ९२६ रूपयात देशात कुठेही करा विमान प्रवास 


गो फर्स्ट एअरलाईन्स कंपनीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कंपन्यांनी आपल्या विक्रीत वाढ करण्यासाठी ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर देतात.


 मार्केटींगच्या जगात वैमानिक कंपन्या सुद्धा इतर कंपन्यांच्या तुलनेत मागे नाहीत. ग्राहकांना देशांतर्गत होणाऱ्या प्रवासासाठी एक भन्नाट ऑफर देऊ करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिवशी Right to Fly या नावाने ही ऑफर दिली जात आहे. या फ्लाईटमुळे ग्राहकांना सर्वात स्वस्त पैशांत देशांतर्गत कुठेही फिरण्याची संधी मिळणार आहे.


 फक्त ९२६ रूपयांत देशात कुठेही फिरण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर लवकरात लवकर मिळवण्यासाठी ग्राहकांना २२ जानेवारी ते २६ जानेवारी या ५ दिवसांच्या आत तिकीट बुकिंग करावी लागेल. तसेच याच दिवसांमध्ये ग्राहक ११ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२२ पर्यंतची तिकीट बुकींग करू शकता.


 तसेच प्रवास करते वेळी तुम्ही १५ किलोपर्यंतचं सामान घेऊन जाऊ शकता. प्रजासत्ताक दिनाची ऑफर फक्त देशांतर्गत तिकिटांवर उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कोणतीही सूट नाही. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटसह कुठूनही तिकीट बुक केल्यास तुम्हाला या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

Post a Comment

0 Comments