धक्कादायक सोलापुरात तिघा-चौघांना उडवत ट्रक घुसला शहरात मंगळवारी रात्रीची घटना
सोलापूर : एक मालवाहतूक ट्रक रात्री साडेनऊच्या सुमारास थेट शहरात घुसला,त्या ट्रकने दोघा-तिघांना उडवल्याची माहिती असून ट्रकसह चालक व वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
मंगळवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान HN 55 Y 0876 या क्रमांकाचा ट्रक अक्कलकोट नाका पाण्याच्या टाकी जवळून एक मालवाहतूक ट्रक थेट शहरांमध्ये घुसला, जोडबसवण्णा चौक येथे आणखी एकाला उडवून तो डायरेक्ट बुधवार बाजार मध्ये घुसला बुधवार बाजारातून खालील पुढे बाराईमाम चौकात रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याला वळण घेता आले नाही तो तिथेच थांबला त्याठिकाणी आल्यानंतर त्याला नागरिकांनी घेराव घातला, यावेळी बराच गोंधळ झाला, लोकांनी ट्रक चालकाला केबिनमधून खाली काढून मारण्याचा प्रयत्न केला.
बराच वेळ झालेल्या गोंधळानंतर जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर ते बारा इमाम चौकात दाखल झाले, त्यांनी ट्रक सह चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी साखर पेठ पोलीस चौकित अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून काही जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली.
0 Comments