google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अखिल भारतीय होलार समाज संघटना दुधेभावी ता क:महकाळ जि सांगली येथील समाज मंदिर मॄतवस्थेत :

Breaking News

अखिल भारतीय होलार समाज संघटना दुधेभावी ता क:महकाळ जि सांगली येथील समाज मंदिर मॄतवस्थेत :

 अखिल भारतीय होलार समाज संघटना दुधेभावी ता क:महकाळ जि सांगली येथील समाज मंदिर मॄतवस्थेत : 


            बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत मा रावसाहेब राजाराम हेगडे.

          

      अखिल भारतीय होलार समाज संघटना शाखा दुधेभावी ता क: महाकाळ जि सांगली येथील होलार समाज मंदिर बांधणी होऊन अंदाजे ३० वर्ष पूर्ण झाली आहेत . होलार समाजातील समाज बांधवांना १५/: निधी म्हणजे काय हे आजतागायत माहिती नाही . माझा होलार समाज गरीब, शांत ,मवाळ, स्वभावाचा असल्यामुळे  दुधेभावी ग्रामपंचायतीकडुन जाणुन बुजुन दुर्लक्ष असल्याचे समाज मंदिर मोडकळी अवस्थेंवरुन मॄतवस्थेत आहे  

    समाज मंदिर बांधुन तीस वर्षे झाली पण, एखदाही दुरुस्ती ,रंगोटी , खिडक्या, दुरुस्ती,फरशी ,पत्रा बदलणे  काम केलेले नाही . होलार समाज वस्तीमधे शासकीय योजनांची अंमलबजावणी केलेली नाही .उदा .गटार,पिविंग ब्लाक,कॉक्रिटचे रस्ते , स्मशानभूमी ईत्यादी मुलभूत सुविधांपासून वंचित आहे

        येणाऱ्या काळात संबंधित कामाची अंमलबजावणी न झाल्यास आपण होलार समाजाला सोबत घेऊन ता  क:महकाळ जि सांगली तहसिलदार साहेब यांना निवेदन देऊन कार्यालय समोर आंदोलन करण्यात येणार आहे असे  


     बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत अध्यक्ष मा . रावसाहेब राजाराम हेगडे म्हणाले.

     यावेळी  देधेभावी येथिल होलार समाजबांधव उपस्थित होते, आमॄत एकनाथ हेगडे, बबन एकनाथ हेगडे,विष्णु शिवाजी हेगडे, अनिल अर्जुन हेगडे ,प्रेमचंद शिवाजी हेगडे,समाधान अंबादास हेगडे,विकास प्रभाकर हेगडे,नागेश बापु हेगडे, दयानंद सुभाष हेगडे,बापु सिधा हेगडे,ईत्यादी.

            

Post a Comment

0 Comments