सांगोल्यातील काँग्रेस हुजरेगिरी करणाऱ्याच्या हातात ठराविक लोकांमध्येच सांगोल्याचा काँग्रेस पक्ष गुरफटल्याने निष्ठावंताची नाराजी
"भाजपाचे तालुकाध्यक्ष हे सांगोला नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते निवडणूक लागली होती त्यावेळी एकमेव असलेल्या काँग्रेसच्या नगरसेविकेने मतदान केल्यामुळे भाजपाचे तालुकाध्यक्ष हे उपनगराध्यक्ष झाले होते त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल जी गांधी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार अशा पद्धतीचे आदेश असतानाही भाजपाच्या उमेदवारास मदत केल्यामुळे मतदान केल्यामुळे तालुक्याचे पदाधिकारी व नेते यांच्या वरती कारवाई होणार काँग्रेस पक्ष हा शिस्त पाळणारा पक्ष असल्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही अशी तालुक्यातील लोकांना खात्री होती परंतु कारवाई करण्यापेक्षा त्यांनाच जबाबदारी दिल्यामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पक्षामध्ये नवीन येणारे पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केले आहे त्यामुळे पुढील काळामध्ये काँग्रेस पक्षाला मोदी सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे का अशा पद्धतीची चर्चा सांगोला तालुक्यात केली जात आहे "
सांगोला- शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्ष सध्या भरकटलेल्या अवस्थेत असून काँग्रेस पक्षाच्या या अवस्थेला हुजरेगिरी करणारे नेतेच कारणीभूत असल्याचे निष्ठावंत काँग्रेसजनां मधून बोलले जात आहे . काँग्रेस पक्षाचे सांगोला शहर व तालुक्याचे अध्यक्ष जाहीर करण्यात आले .
विशेष म्हणजे या नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे , त्यामुळे विशिष्ट नेत्या भोवतीच फिरणारा सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्ष खरोखरच स्वावलंबी होणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने निष्ठावंत काँग्रेस जनांकडून विचारला जात आहे .
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकच नगरसेवक आहे , परंतु नगरपालिकेच्या आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला नेहमीच गृहित धरूनच आघाडीमध्ये या पक्षाचा समावेश केला जातो परंतु काँग्रेस पक्षाची ताकद जास्त असताना देखील
हुजरेगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे अवघ्या एक ते दोन जागेवर नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला समाधान मानावे लागत असल्याने हुजरेगिरी करणार्या नेत्यांना वाढवायचा आहे की बुडवायचा आहे ? असा प्रश्न यानिमित्ताने निष्ठावंताकडून विचारला जात आहे .
काँग्रेस पक्षात गट असले तरी जनमानसात उजळ मोजण्याइतकेच नेते असल्याने काँग्रेस पक्षाची सांगोला शहर व तालुक्यात ही दुरावस्था असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत .
हुजरेगिरी करणाऱ्या झाली नेत्यांना जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्ताच थांबवले नाही तर नावाला राहिलेला काँग्रेस पक्ष सांगोला तालुक्यातून नक्कीच लयास जाईल अशी शक्यता आहे
या निमित्ताने राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे . ठराविक लोकांमध्येच सांगोल्याचा काँग्रेस पक्ष गुरफटलेला असून ज्या लोकांना जनतेमध्ये किंमत नाही ज्यांना कोणी ओळखत नाही जे केवळ हुजरेगिरी करूनच हां जी , हां जी करतात
अशाच लोकांना काँग्रेस पक्षाची सध्या पदे मिळत असल्याने हुजरेगिरी करणाऱ्यांना अच्छे दिन आले , अन् निष्ठावंत काँग्रेस जणांची मात्र परफ्सट सुरू असल्याचे दिसून येत आहे ,
त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल तर लोकांमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेले व लोकाश्रय असलेल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाने संधी देऊन रसातळाला चाललेला काँग्रेस पक्ष पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा निष्ठावंत काँग्रेस जणांकडून व्यक्त केली जात आहे .

0 Comments