google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोस्ट ऑफिसची हटके योजना; केवळ ५ वर्षांत तुमची मुलं होणार लखपती!

Breaking News

पोस्ट ऑफिसची हटके योजना; केवळ ५ वर्षांत तुमची मुलं होणार लखपती!

 पोस्ट ऑफिसची हटके योजना; केवळ ५ वर्षांत तुमची मुलं होणार लखपती! 


आर्थिक नियोजन करणे ही सध्या अत्यंत महत्वाची बाब ठरत आहे. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी अनेकजण हल्ली अगोदरच आर्थिक नियोजन करण्याला प्राधान्य देतात. यासाठी अनेक सरकारी योजना देखील आहेत. याशिवाय, आर्थिक नियोजनाच्या या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसकडे तुमच्यासाठी उत्तम संधीही आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवूण जास्त फायदा मिळवू शकता. शिवाय, पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.



या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त २ हजार रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर मात्र ५ वर्षानंतर तुमचे मूल लखपती होईल. आता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगले आर्थिक नियोजन करू शकता, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.



अल्पवयीन मुलांसाठी योजना

पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेमध्ये तुम्ही अल्पवयीन मुलांचे कायदेशीर पालक बनून आरडी सुरू करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक पाच वर्षांत परिपक्व (मॅच्युअर) होते. तुमच्या मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या नावाने या योजनेत मासिक २,००० रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास वयाच्या पाचव्या वर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमा होईल.



पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर किती व्याज मिळते?

जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर दर महिन्याला आरडीमध्ये २ हजार रुपये जमा केले, तर पाच वर्षांत ही रक्कम एक लाख ४० हजार रुपये इतकी होईल. पोस्ट ऑफिसकडून सध्या ५.८ टक्के इतके व्याज दिले जाते. याशिवाय चक्रवाढ व्याज तिमाही आधारावर केली जाते. अशा प्रकारे, ५ वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर मोठी रक्कम जोडू शकता.



वेळेपूर्वीही काढू शकता पैसे –

तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने आरडी खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडले पण जर मुदतपूर्तीपूर्वी तुम्हाला पैशांची गरज असेल, तर तुम्ही ते बंद करू शकता. मात्र आरडी खात्यात जर ३ वर्षांसाठी पैसे जमा केले असतील, तरच तुम्ही हे करू शकता.



महत्वाची गोष्ट म्हणजे, मुदतपूर्तीपूर्वी आरडी खात्यातून पैसे काढल्यावर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकेच व्याज मिळेल. आरडी खाते देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते.

Post a Comment

0 Comments