जुनोनी येथे बाळुमामा सुपर मार्केटला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट…
सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे सांगोला रोडवर असलेले बाळु मामा सुपर मार्केटला शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.हिरवे परिवाराकडून डॉ बाबासाहेब देशमुख उपस्थित राहिल्याबध्दल प्रा हनुमंत श्रीराम सर यांच्या वतिने सन्मानपुर्वक शाल श्रीफळ फेटा देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले उद्योजक सचिन हिरवे यांनी जुनोनी परिसरात पहिले सुपर मार्केट सुरु करुन आदर्श निर्माण केला आहे,या सुपर मार्केटमुळे गावातील ग्राहकांची चांगलीच सोय झाली आहे असे सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी पोपटराव तंडे साहेब,युवक नेते विलास व्हनमाने पैलवान ,पत्रकार जगदिश कुलकर्णी, दत्ता व्हनमाने टेलर शिवाजी व्हनमाने गुरुजी सुनील मोहिते सर, पांडुरंग व्हनमाने, दत्तात्रय नरळे, हनुमंत श्रीराम सर भागवत देशमुख डॉक्टर संतोष नरळे, अशोक सरगरपांडुरंग नरळे, डी टी व्हनमाने सर, प्रसाद व्हनमाने सेक्रेटरी दादा गडदे पाटील बंडू व्हनमाने, रामभाऊ माने
विनायक व्हनमाने सचिन हिरवे दगडू गडदे महादेव आनिकेत पोरे, फोटोग्राफर जयदिप होवाळ पदाधिकारी उपस्थित होते डॉ देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

0 Comments