google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'त्याने' तयार केली बॅटरीवर चालणारी सायकल !

Breaking News

'त्याने' तयार केली बॅटरीवर चालणारी सायकल !

 'त्याने' तयार केली बॅटरीवर चालणारी सायकल !


कुर्डूवाडी : अनेक तथाकथित शहरी लोक खेड्यातल्या पोरांना काही अक्कलच नसते अशा गैरसमजात असतात पण ग्रामीण भागातही खूप काही टॅलेंट असते हे पुन्हा एकदा समोर आले असून लऊळ येथील निखिलने चक्क बॅटरीवर चालणारी सायकल बनवली आहे. 


ग्रामीण भागात खूप काही टॅलेंट असते पण त्यांना वाव मिळत नसल्याने ते जगासमोर येत नाही, शहरी भागात कुणी काही सामान्य केले तरी त्याला मोठी प्रसिद्धी मिळते आणि वाहवा होते त्यामुळे सगळे काही शहरातच आहे असा आभास निर्माण होतो. वास्तविक शहरात जाऊन काही भव्यदिव्य केलेली ही मुले कुठल्यातरी खेड्यातूनच गेलेली असतात. माढा तालुक्यातील लऊळ गावच्या निखिलने असेच आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.


 पेट्रोलच्या दरवाढीला वैतागून त्याने चक्क बॅटरीवर चालणारी सायकल बनवली आहे.  गेल्या तीन चार वर्षांपासून पेट्रोल डीझेलचे दर रोज वाढत आहेत आणि त्यामुळे वाहने चालवणे आता ज्याला त्याला कठीण होऊन बसले आहे. इंधनाचे दर कमी होण्याची तर शक्यताच नाही पण ते वाढत जातील याची मात्र आता खात्रीच होऊ लागली आहे. 


खरं तर पेट्रोल शिवाय आपली गाडी चालावी असं आता सगळ्यांनाच वाटायला लागलाय पण ते शक्य नाही. मग इंधनाच्या खर्चाला फाटा देण्यासाठी काही तरी करायला हवं ! असाच काहीसा विचार लउळ गावाच्या निखील विलास बोडके या


 विद्यार्थ्याच्या मनात आला. हा विचार आल्यावर नुसता विचार करून त्याने हा विषय सोडून नाही दिला. विचाराला आकार देत त्याने पेट्रोलशिवाय धावणारी सायकल बनवली.  कुर्डूवाडीच्या के एन भिसे महाविद्यालयात शिकणारा हा विद्यार्थी. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला. हायस्कूलला जाण्यासाठी 


त्याला एक सायकल आणलेली होती. आता ती अडगळीत पडली होती. त्या सायकलकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्या डोक्यातल्या विचारला आकार येऊ लागला. निखिलने ती सायकल घेतली आणि सुचलेला प्रयोग करायला त्याने सुरुवात केली. त्याने मेहनत घेतली आणि त्याची ही जुनी सायकल मोटार सायकलसारखी पळायला लागली. 


आपल्या सायकलला त्याने बॅटरीवर चालणारी मोटार बसवली आणि लेक्टिरिक साहित्य, बॅटरी ठेवण्यासाठी त्याने जुन्या गाडीची डिक्की काढून ती सायकलच्या कॅरेजजवळ फिट केली. हे सायकल सुरु होताच वेगात धावू लागते. चढ सुद्धा सहज चढून जाते आणि वेग कमी जास्त करण्यासाठी उजव्या हॅण्डलचा उपयोग करता येतो. एकट्यापुरतीच नव्हे तर दोघेजण बसून या सायकलवरून जाऊ शकतात आणि दोघे बसून चढ देखील चढू शकतात. चार तासाची बॅटरी एकदा चार्ज केली की या सायकलचा प्रवास सुरु ! 


घराच्या घरी बनविलेली हीच सायकल घेऊन निखिल गावातून शेतात जाऊ लागला आहे. गावातील लोक गावातील पोराचे कौतुक पाहून कौतुक करू लागले आहेत. आपल्या गावाचा पोरगाही काही तरी वेगळे करून शकतो याची चुणूक गावकऱ्यानी पहिली आहे.  निखिलने ही सायकल बनविण्यासाठी काही साहित्य त्याने 


ऑनलाईन मागवून घेतले तर काही साहित्य त्याने स्थानिक गॅरेजमधून उपलब्ध करून घेतले. अवघ्या पंधरा हजारात त्याची ही सायकल झाली तयार ! तो या सायकलवरुन जाताना लोक कुतूहलाने पाहतात आणि त्याचे कौतुकही करतात.  त्याने तसे कौतुकाचे कामचं केले आहे ना ! चमत्काराला नमस्कार तर असतोच की !

Post a Comment

0 Comments