google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डिजिटल सभासद नोंदणीतून बूथ मजबूतीचा नारा ; आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, बूथ कार्यकर्ता पक्षाचा कणा

Breaking News

डिजिटल सभासद नोंदणीतून बूथ मजबूतीचा नारा ; आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, बूथ कार्यकर्ता पक्षाचा कणा

 डिजिटल सभासद नोंदणीतून बूथ मजबूतीचा नारा ; आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, बूथ कार्यकर्ता पक्षाचा कणा



सोलापूर : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी वतीने डिजिटल सभासद नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर शहर कॉंग्रेस ब्लॉक व प्रभाग स्तरावरील नोंदणीकर्त्यांची प्रशिक्षण शिबीर कॉंग्रेस भवन सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे सहप्रभारी सोनाली मारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


या प्रशिक्षण शिबिरात सभासद नोंदणीकर्त्यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चिटणीस ऍड मनिष गडदे, प्रा नरसिंह आसादे यांनी डिजिटल सभासद नोंदणी कशी करावी याबद्दल माहिती दिली.


यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, कॉंग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्मीयांना बरोबर घेवून जाणारा पक्ष असून सर्वसमान्यांच्या विकासासाठी झटणारा पक्ष आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरू केले असून त्यामध्ये नोंदणीकर्त्यांनी, कार्यकर्त्यांनी, प्रत्येक बूथ वर सभासद नोंदणी करावी.


त्यांच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे विचार, धोरण, विकासकामे, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेचे अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल. बूथ स्तरावरील कार्यकर्ता हा पक्षा खरी ताकद असून त्यांच्यामुळे पक्ष मजबूत होत असतो.


तसेच यावेळी सोलापूर शहर सहप्रभारी सोनाली मारणे म्हणाल्या, कोणत्याही निवडणुकीत बूथ स्तरावरील कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्यांच्याच माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज पोहोचता येते. तसेच ते कार्यकर्ते जनतेच्या कायम संपर्कात, सुखदुःखात सहभागी असतात त्यांना जनतेचे प्रश्न माहीत असतात, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढवून सोलापूर महापालिकेवर तिरंगा फडकाविण्यासाठी प्रत्येक नोंदणीकर्त्यांनी प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त डिजिटल सभासद नोंदणी करावी असे आवाहन केले.


या प्रशिक्षण शिबिरात प्रदेश चिटणीस किसन मेकाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार,  नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, नरसिंग कोळी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उदयशंकर चाकोते, देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे,  सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, आझम सैफन, हाजीमलंग नदाफ, तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, विवेक कन्ना, मल्लिनाथ सोलापुरे, नागनाथ कोप्पा, प्रशांत बंदपट्टे, सुरेश तोडकरी, भीमराव साठे,


अरविंद पसनुर, सलीम मंगलगिरी, नागेश बोमडयाल, शाहू सलगर, श्रीनिवास व्हसकेरी, सागर शिंगे, शिवाजी सैनसाखळे, नरेश महेश्वरम, सादिक अत्तार, जुबेर शेख, कुणाल गायकवाड, रोहित कोळेकर, धीरज खंदारे, अजयकुमार सुतार, प्रभाकर सादुल, श्रीकांत वाडेकर, परशुराम सतारेवाले, दाऊद नदाफ, रवी आंबेवाले, शिवाजी जाधव, प्रमिला तुपलवंडे, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, शिल्पा चांदणे, यांच्यासह इतर नोंदणीकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


या शिबिरास सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचे सहकार्य लाभले. या शिबिराचे नियोजन मनोज यलगुलवार यांनी प्रास्ताविक कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, तर सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला आभार प्रदर्शन अशोक कलशेट्टी यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments