google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऐकावं ते नवलंच! माणसाच्या शरीरात बसवलं चक्क डुकराचं हृदय, कशी आहे रुग्णाची प्रकृती?

Breaking News

ऐकावं ते नवलंच! माणसाच्या शरीरात बसवलं चक्क डुकराचं हृदय, कशी आहे रुग्णाची प्रकृती?

 ऐकावं ते नवलंच! माणसाच्या शरीरात बसवलं चक्क डुकराचं हृदय, कशी आहे रुग्णाची प्रकृती? 



नवी दिल्ली – एकीकडे संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचं संकट उभं ठाकलं असताना दुसरीकडे विज्ञान जगताला मोठं यश मिळालं आहे. कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेच्या डॉक्टरांनी एका माणसाच्या शरीरात चक्क डुकराचं हृदय बसवलं आहे. येथील एका 57 वर्षीय व्यक्तीवर सात तास शस्त्रक्रिया करून त्यांच्या हृदयाच्या जागी डुकराचं हृदय ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपित करण्यात आलं आहे. डेव्हिड बेनेट असं शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.



मानवाच्या शरीरात डुकराचे हृदय प्रत्यारोपण करण्याची जगातील ही पहिल्या शस्त्रक्रिया आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर या प्रयोगामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अवयव दानाची तीव्र कमतरता दूर करण्यात मदत होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी एक पत्रक जारी केलं. त्यांनी ही शस्त्रक्रिया म्हणजे ऐतिहासिक पाऊल आहे असं म्हटलं आहे.



तसचं प्राणी ते मानव प्रत्यारोपणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असं या निवेदनातून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, डेव्हिड बेनेट या रुग्णाला मानवी प्रत्यारोपणासाठी योग्य मानलं जात नव्हतं परंतु त्याची प्रकृती खालावल्याने त्याचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी डेव्हिड यांच्या शरीरात डुकराचं हृदय लावण्यात आलं.



दरम्यान, डेव्हिड यांच्यावर यशस्वी प्रत्यारोपणानंतर हे हृदय त्यांच्या शरीरात कसं काम करतं आहे यावर अमेरिकेतले डॉक्टर आणि सर्जन लक्ष ठेवून आहेत. माहितीनुसार डेव्हिड यांची प्रकृती स्थिर आहे. डेव्हिड गेल्या काही महिन्यांपासून अंथरूणाला खिळून आहेत. हार्ट लंग बायपास मशीनच्या आधारे ते जगत होते. डेव्हिड म्हणाले की माझ्याकडे दोनच पर्याय उरले होते की हार्ट ट्रान्सप्लांट करावं किंवा मरण पत्करी. मी जगणं निवडलं.



त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत डुकराचं हृदय रोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तब्बल सात तास सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर बेनेट यांची तब्येत सुधारत असून ते व्हेंटिलेटरशिवाय स्वत: श्वास घेत आहेत. मी बरं झाल्यावर अंथरुणातून बाहेर पडण्याची वाट पाहत आहे, असं बेनेट यांनी म्हटलं आहे.



डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सप्लांटची ही प्रक्रिया आम्ही केली आहे ती सावधगिरी बाळगली आहे. आम्ही आशावादी आहोत ही सर्जरी यशस्वी झाली आहे त्यानंतर हे वाटतं आहे की भविष्यात प्रत्यारोपणासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.

Post a Comment

0 Comments