सेल्फी काढत महिलेने घेतला गळफास
सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होत असलेल्या जाचाला कंटाळून नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा येथे घडलीय . या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलं आहे .
सेल्फी क्लिक करुन आत्महत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे बुलडाण्यातील कठोरा येथे 20 वर्षीय विवाहितेने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे . धक्कादायक बाब म्हणजे या विवाहितेने आत्महत्येपूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता .
हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतला असं बोललं जात आहे .जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असे सासरच्या मंडळींकडून वारंवार बोलून हिणवलं जात होतं . इतकेच नाही तर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे .
प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . या प्रकरणी जलंब पोलीस अधिक तपास करत आहेत

0 Comments