google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे तिघांनी मिळून पिता - पुत्र तलवारीने मारून जखमी केले

Breaking News

सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे तिघांनी मिळून पिता - पुत्र तलवारीने मारून जखमी केले

 सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे तिघांनी मिळून पिता - पुत्र तलवारीने मारून जखमी केले 


सांगोला येथे रागाने बघितल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून पिता- पुत्रास तलवारीने मारून जखमी केले . तर इतर दोघांना लाथाबुक्क्यांनी दगडाने मारहाण करून जखमी केले . तसेच घराचा दरवाजा तोडुन दीड हजार रुपयांचे नुकसान करून परत आमच्या नादाला लागाल तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली .


 याप्रकरणी कल्पना युवराज चव्हाण रा . जुनोनी , ता . सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु सरगर , विजय सरगर , तंडे यांचा मुलगा सर्व रा . जुनोनी ता . सांगोला यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . 


जुनोनी ता . सांगोला येथील कल्पना युवराज चव्हान यांचे पती युवराज व मुलगा तुषार असे दोघेजण गावात इस्त्रीकरीता टाकलेले कपडे आणण्यासाठी मोटारसायकलवरून येत असताना जुजारपुर रोडला त्याचा मित्र दिसल्याने तो पाठीमागे बघत होता 


 त्याचवेळी गावातील तंडे याचा मुलगा व राजु सरगर त्यांचेमोटारसायकलवर चालले होते . त्यावेळी राजु सरगर यास वाटले की , तुषार याने मुद्दाम माझेकडे वळुन बघितले . दुपारी २ च्या सुमारास राजु सरगर , विजय सरगर , तंडे यांचा मुलगा असे मिळुन चव्हाण यांच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करु लागले . 


त्यावेळी कल्पना चव्हाण यांनी आम्हाला शिवीगाळ का करता असे म्हणत असताना तुमच्या मुलाने मुद्दाम रागाने मागे वळुन बघितले असल्याचे राजू सरगर म्हणाला . राजु सरगर व विजय सरगर याने ते दोघे कोठे आहेत ,


 मी सोडणार नाही असे म्हणून घराच्या दरवाजावर दगड व लाथा मारुन दरवाजा तोडून युवराज चव्हाण व तुषार चव्हाण यांना घरातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बाहेर आणले . राजू सरगर याच्या हातातील तलवार कोणास तरी लागेल असे म्हणुन ती काढुन घेत असताना त्याने तुषार याच्या डावे हाताचे पोटरीवर व पोटाचेवर छातीजवळ मारुन जखमी केले . 


तर युवराज चव्हाण यांच्या डावे पायाचे घोट्याजवळ तलवार लागल्याने जखम झाली . त्यानंतर कल्पना चव्हाण , मुलगा व कामगार सदरचे भांडण सोडवीत असताना विजय सरगर याने कल्पना व कामगार अनिल बेहेरे या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . त्याचवेळी तंडेयांच्या मुलाने यांना खुप मस्ती आली आहे , 


असे म्हणुन तेथेच पडलेला दगड हातात घेवुन कल्पना चव्हाण यांच्या हातावर , पायावर , डोकीवर मारला . सदरची भांडणे लीला पवार , राजु चौगुले यांनी सोडवली . सदर भांडणामध्ये कल्पना चव्हाण यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे . याप्रकरणी कल्पना चव्हाण यांनी वरील तिघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

Post a Comment

0 Comments