google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात लस न घेतलेल्या नागरिकांना आता रस्त्यावर फिरणे होणार बंद;

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात लस न घेतलेल्या नागरिकांना आता रस्त्यावर फिरणे होणार बंद;

 सोलापूर जिल्ह्यात लस न घेतलेल्या नागरिकांना आता रस्त्यावर फिरणे होणार बंद;



 आजपासून प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच मिळणार 'या' सेवाकोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झाले असतील, तरच नागरिकांना शुक्रवारपासून रस्त्यावर फिरणे सोयीचे होईल. शिवाय रेशनचे धान्य, भाजी, पेट्रोल, मद्य, सरकारी कार्यालये , दुकानांमध्ये प्रवेश मिळेल. 


सेतू कार्यालयात दाखला काढायचा असेल तरीही दोन डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे. महापालिका, पोलीस आणि डॉक्टरांची पथके शुक्रवारपासून पेट्रोल पंपांपासून सर्व आस्थापनांची तपासणी करणार आहेत.शासनाने कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना सेवा सुविधांचा लाभ मिळेल, असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल महसूल, महापालिका, पोलीस, आरोग्य विभागाची संयुक्त बैठक घेतली.


यावेळी पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, मनपा उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.बसवराज लोहारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे संकट जिल्ह्यावर आहे. जिल्ह्यातील लसीकरणाबद्दल जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत लसीकरण पूर्ण झाले पाहिजे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. आस्थापनांमध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये, असे सांगितले.


लस न घेणाऱ्याला ५०० रुपये , मॉलमालकाला बसेल ५० हजार रुपये दंड

नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाईन डाऊनलोड करणे शक्य आहे. मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवता येते.

Post a Comment

0 Comments