खळबळ! सोलापूर जिल्ह्यातील 55 गावचे सरपंच पद रद्द होणार? मंगळवेढ्यातील 'इतक्या' सरपंचांना नोटिसा
कोरोना लसीकरणासाठी गावागावात लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे असताना सुद्धा गावचे सरपंच लसीकरणासाठी साथ देत नसल्यामुळे
त्यांचे सरपंचपद का रद्द करण्यात येऊ नये ? अशा प्रकारची नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील ५५ गावच्या सरपंचांना धाडली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ अ नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत नोटीस बजावत कडक पावले उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लस देण्यात येते. गावागावातील आशा वर्कर्स यासाठी जनजागृती करतात.
वाड्या-वस्त्यांवरती जाऊन लोकांना समजावतात मात्र सरपंच लसीकरणाबाबत गांभीर्य बाळगत नसल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर राज्य शासन लसीकरणाबाबत प्रचंड गंभीर झाले असून प्रशासन सध्या त्यासाठी मिशन मोडवर आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ११, अक्कलकोट ५, बार्शी १० करमाळा ७, माढा ५, माळशिरस ५, मोहोळ ५, पंढरपूर ५ , सांगोला १२, उत्तर सोलापूर ५, दक्षिण सोलापूर आदी गावच्या सरपंचांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

0 Comments