संत रोहिदास हे जातीय व्यवस्थेचे सर्वात मोठे विरोधक होते
प्रा. डॉ. दीपक रिटे
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रा. डॉ. प्राचार्य रघुनाथराव फुले समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रा. डॉ. आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, थोर संत रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील गोवर्धन पूर गावात झाला. संत रोहिदास हे लहानपणापासून संतांच्या सहवासात आणि त्यांच्या प्रभावाखाली रहात असे त्यामुळेच त्यांना अध्यात्माची गोडी लागली, आपल्या कामावर ते भक्ती आणि विश्वास ठेवत असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना पारंपारिक व्यवसाय करण्यास सांगितले.
ते आपले काम समर्पित भावनेने करीत असे गरज पडेल त्या कामाची किंमत न घेता मदत करत असे, ते त्यांना चप्पल बनवून देत असे संत रोहिदास यांचा स्वतःच्या कामावर आणि घेतलेल्या प्रतिज्ञेवर प्रचंड विश्वास होता. म्हणूनच त्यांनी सार्वजनिक जीवनातील असलेले गंगास्नान हे नाकारले होते हीच घटना त्यांच्या कर्तुत्वाची निष्ठा आणि आज्ञाधारक पणा दाखवणारे आहे. ते म्हणत असे माझे मन जर स्वच्छ असेल तर माझे चपला धुवायची जागादेखील गंगा आहे तेव्हापासूनच" मन चंगा तो कटौती मे गंगा" ही म्हण प्रचलित झाली आपले मन शुद्ध असेल तर देव आपल्या अंतकरणात वास करतो. अशी त्यांची श्रद्धा होती. आपले मनोगत व्यक्त करताना पुढे प्रा. डॉ. दीपक रिटे म्हणतात की, संत रोहिदास हे नेहमीच जातीय विषमता आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणारे व्यक्तिमत्व होते.
त्यांनी समाजामध्ये असलेल्या अनिष्ट प्रथा यांना विरोध केला त्यांनी आपले स्वतःचे घरही सोडले, पण ते सामाजिक विषमतेविरुद्ध लढतच राहिले असे असले तरी त्यांनी भक्ती मार्ग सोडला नाही. यावरून स्पष्ट होते की, संत रोहिदास हे जातीव्यवस्थेचे सर्वात मोठे विरोधक होते. ते म्हणत असे, मानवाने निर्माण केलेल्या जाती वादामुळे माणूस माणसापासून दूर होत आहे माणूस माणसात ठेवायचा असेल तर सामाजिक विषमता ही नष्ट केलीच पाहिजे. तेव्हा विद्यार्थ्यांनी संत रोहिदास महाराज यांचे जीवन चरित्र जगण्यातील विचार, तत्त्वज्ञान हे अंगीकारले पाहिजे व समाज परिवर्तनाला हातभार लावला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ राव फुले होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट केले की , संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समाजसुधारणा, मागासलेपण अज्ञानी पणा जाणार नाही तर त्यांचे विचार तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. समाजामध्ये संत रोहिदास महाराज यांच्या विचारांची जनजागृती केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने संत रोहिदास महाराज यांच्या विचाराचा तत्वांचा आदर्श घेतला असे होईल, तरच खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या विचाराला अभिवादन केले असे होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. तर आभार प्रा. अशोक वाकडे यांनी मांडले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments