google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कृष्णा-भीमा प्रकल्पाबाबत राज्याकडून प्रतिसाद मिळेना : केंद्राचे खासदार निंबाळकरांना उत्तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य सरकार उदासिन : श्रीकांत देशमुख

Breaking News

कृष्णा-भीमा प्रकल्पाबाबत राज्याकडून प्रतिसाद मिळेना : केंद्राचे खासदार निंबाळकरांना उत्तर कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य सरकार उदासिन : श्रीकांत देशमुख

 कृष्णा-भीमा प्रकल्पाबाबत राज्याकडून प्रतिसाद मिळेना : केंद्राचे खासदार निंबाळकरांना उत्तर

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य सरकार उदासिन : श्रीकांत देशमुख



सांगोला (जि. सोलापूर) : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागांसाठी वरदायिनी ठरणारा कृष्णा-भीमा स्थिरीकरण या महत्वकांक्षी प्रकल्पाबाबत राज्य सरकार उदासिन असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हा प्रकल्प फायदेशीर आहे का? याबाबत राज्य सरकारकडे  विचारणा केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही प्रतिसाद राज्याकडून मिळालेला नाही, असे उत्तर जलशक्ती मंत्रालयाकडून माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांना देण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली आहे.


खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना 10 मार्च रोजी भेटून कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प तत्काळ मार्गी लावावा, अशा आशयाची मागणी पत्राद्वारे केली होती. जलशक्ती मंत्रालयाच्या आयुक्तांनी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना पुढील सूचनेद्वारे अहवाल मागविला होता. त्यामध्ये सूचित केले होते की, राज्य राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने (एनडब्लूडीए) कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास पूर्वव्यवहार्य रिपोर्ट (प्रकल्प फायदेशीर आहे का?) राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला होता. त्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे खासदार नाईक निंबाळकर यांना जलशक्ती मंत्रालयाने पत्राद्वारे कळविले आहे. केंद्र सरकारच्या पत्राबरोबर खासदार म्हणून आपणही कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाविषयी राज्याकडे पाठपुरावा करावा, असेही पत्रातून नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments