सांगोला शहरातील विविध रस्त्यांसाठी 25 कोटी रू. निधीची मागणी
लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरासह इतर वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. त्यामध्ये सातत्याने पडणार्या पावसामुंळे तर रस्ते खचतच चालले आहेत. तसेच सांगोला शहराचा परिसर हा 68.84 चौ.किमी व्यासाचा असल्यामुळे नियमित मिळणारा रस्ता अनुदान निधी हा अपुरा पडत असल्यामुळे
आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांनी शासन दरबारी मागणी करून सांगोला शहरातील विविध रस्त्यांसाठी सुमारे 25 कोटी रूपये विशेष रस्ता अनुदान निधी मंजूर करून द्यावा, जेणेकरून शहरातील रस्ते चांगल्या पध्दतीचे करता येतील, अशा आशयाचे पत्र लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांना दिले आहे.
यावेळी सांगोला नगरपरिषदेच्या बांधकाम समिती सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी आदी उपस्थित होते.

0 Comments