google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश : ग्रामीण भागात अधिकाऱ्यांच्या नेमणुका

Breaking News

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश : ग्रामीण भागात अधिकाऱ्यांच्या नेमणुका

 सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश : ग्रामीण भागात अधिकाऱ्यांच्या नेमणुका



सोलापूर : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोवीड-१९ प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार दि. १४ मार्च २०२० रोजी अधिसुचना निर्गमित केलेली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करणेत आलेली आहे व त्यातील कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पद सिध्द अध्यक्ष आहेत. तसेच दिनांक १४ मार्च २०२० च्या अधिसुचनेमध्ये नमूद नियम १० नुसार सदर नियमांची अंमलबजावणी करणेकामी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.


ज्याअर्थी, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसुचना क्रमांक DMU/२०२० /CR.९२/DisM-१ दिनांक २९/७/२०२० रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील रूग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत ज्याअर्थी, राज्यातील Covid - १९ लसीकरणाचे प्रमाण ८५% असून, सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ७२% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. कोविड १९ लसीकरणा संदर्भात मा.अपर मुख्य सचिव यांनी सोलापूर जिल्हयाचे लसीकरणाचे काम कमी असलेबाबत नाराजी व्यक्त करून लसीकरणाचा गती वाढविणेबाबत निर्देश दिलेले आहेत..


ज्याअर्थी, सोलापूर जिल्हयामध्ये एकूण ११४४ गावांपैकी १०१ गावांमधील लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. सदर गावांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर १०१ गावांमध्ये पालक अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.



त्याअर्थी, मी मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर या आदेशाव्दारे सोलापूर जिल्हा (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) ज्या गावामध्ये लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. सदर गावांतील लसीकरणाचा वेग वाढविणेकामी खालील अधिकारी यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. कोणत्या तालुक्यात कोण अधिकारी पहा ही यादी




Post a Comment

0 Comments