खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना -
दारूच्या नशेत पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने पप्पू पैगंबर शेख ( वय ३५ रा.जित्ती ) यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणाची फिर्याद मयताचा भाऊ दावल पैगंबर शेख यांनी दिली. मयत पप्पूला दारूचे व्यसन होते.
पत्नीच्या उपचारासाठी तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्यामुळे तो एकटाच होता शुक्रवारी ता.१० रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान त्याला जेवण देण्यासाठी फिर्यादीचा भाऊ त्याच्या घरी गेला असता त्याची लहान मुले बाहेर खेळत होती.
त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही. दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता, त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

0 Comments