google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 २२ आमदार , खासदारांविरुद्ध तक्रार रस्ते कामात टक्केवारी मागत असल्याने गडकरींनी उचलले पाऊल

Breaking News

२२ आमदार , खासदारांविरुद्ध तक्रार रस्ते कामात टक्केवारी मागत असल्याने गडकरींनी उचलले पाऊल

  २२ आमदार , खासदारांविरुद्ध तक्रार रस्ते कामात टक्केवारी मागत असल्याने गडकरींनी उचलले पाऊल



आर्थिक ठेकेदारांवर स्वतःच्या फायद्यासाठी दबाब टाकणाऱ्या आमदार तसेच खासदारांविरुद्ध केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) तक्रार केली आहे . गडकरी यांनी सीबीआयच्या निदेशकांकडे जवळपास २२ नावांची यादी सोपविली असून , या सर्वाविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे .


 दस्तुरखुर मंत्र्यांकडून तक्रार असल्याने मराठवाडा , कोकण , पुणे विभागातील आमदारांची नावे ? औरंगाबाद येथील रस्त्याच्यासंदर्भात एका ठेकेदाराशी झालेल्या बोलण्यातून हा विषय गडकरी यांच्यासमोर आला . विदर्भ , मराठवाडा , पुणे तसेच कोकण विभागातील आमदारांची नावे या यादीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले . सीबीआयकडून लवकरच या आमदार खासदारांविरुद्ध लवकरच कठोर पावले उचलली जाऊ शकतात . आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून टक्केवारीची अपेक्षा करणाऱ्या तसेच त्यासाठी ठेकेदारांना त्रास देणाऱ्या आमदार , खासदारांबर गडकरी कमालीचे नाराज आहेत .



 प्राप्त माहितीनुसार गडकरी यांनी सीबीआय निदेशकांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि हा सगळा विषय त्यांच्या पुढयात ठेवला . ठेकेदाराकडून आमदाराने , टक्केवारी मागणे म्हणजे रस्त्यांचा सत्यानाश आहे . जो प्रत्यक्ष काम करतो आहे , त्याचा नफा या घटकांच्या टक्केवारीमुळे कमी होतो आणि रस्त्याच्या दर्जावर , गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो . हे मला नको आहे , असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले 

Post a Comment

0 Comments