सांगोल्यात स्वतंत्र सायकलिंग मार्ग करावेत : शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरात सायकलिंग मार्ग तयार करावेत अशा मागणीचे आग्रही निवेदन मुख्याधिकारीसो , नगरपरिषद सांगोला व आमदार शहाजीबापू पाटील यांना दिल्याची माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आली सांगोला शहरात असणाऱ्या रस्त्यालगत समांतर सायकलिंग मार्ग विकसित करावेत त्यामुळे शहरात सायकलिंगला अडचण येणार नाही .
समांतर मार्ग विकसित झाल्यास अनेक सायकलिस्ट सुरक्षित सायकलिंग करू शकतील व शहराच्या प्रदूषणात घट होण्यास मदत होईल . सद्य परिस्थितीत रस्ते अरुंद असल्याने सायकलिंगला मोठा अडथळा निर्माण होत आहे . अपघाताची शक्यता नाकारता येत नाही . इंदापूर ( जि . पुणे ) नगरपरिषदेने विकसित केलेल्या शंभर फुटी रोडच्या धर्तीवर सांगोला शहरात स्वतंत्र सायकलिंग मार्गची निर्मिती करून विकासात भर टाकून शहर प्रदूषण मुक्त होण्यास निश्चित मदत होईल .
तरी नगरपालिकेने इंदापूरच्या धर्तीवर सायकल मार्ग तयार करून प्रदूषण मुक्त सांगोला करण्यासाठी स्वतंत्र समांतर मार्गाची निर्मिती करावी अशी आग्रही मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हाधिकारीसो , सोलापूर यांनाही दिल्याची माहिती अशोक कामठे संघटनेने दिली आहे . कोट पर्यावणाचे महत्व राखले जावे पेट्रोलची बचत व्हावी तसेच मोटरसायकलमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे , प्रत्येक नागरिकांनी राहण्याच्या ठिकाणापासून नागरिकांनी आपल्या जवळच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता सुरक्षित सायकलिंग मार्ग सांगोल्यात होणे हि काळाची गरज ओळखून अशोक कामटे संघटना प्रयत्नशील आहे .

0 Comments