google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिंचोली येथे शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची दमदार एन्ट्री चिंचोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध : आम. शहाजी बापू पाटील

Breaking News

चिंचोली येथे शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची दमदार एन्ट्री चिंचोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध : आम. शहाजी बापू पाटील

 शेकापला अखेरचा रामराम ठोकत चिंचोली येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश



चिंचोली येथे शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची दमदार एन्ट्री 

चिंचोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध : आम. शहाजी बापू पाटील 


सांगोला/प्रतिनिधी :राजकारण आणि समाजकारणात वाटचाल करत असताना पक्षपात कधीच केला नाही. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आज चिंचोली गावातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्या सर्वांचे स्वागत करून यापुढील काळात चिंचोली  गावच्या विकासासाठी मी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. असा विश्वास आम. शहाजीबापू पाटील यांनी दिला. 


      एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बलेकील्ला समजल्या जाणाऱ्या चिंचोली ता. सांगोला येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शेकाप ला अखेरचा रामराम ठोकत आम. शहाजीबापू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला.


      5 डिसेंबर रोजी चिंचोली येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिंचोली येथे हातामध्ये शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, निरीक्षक कैलास चव्हाण, तालुकाध्यक्ष सूर्यकांत घाडगे, शहराध्यक्ष कमृद्दिन खतीब, प.स. सदस्य सुभाष भाऊ इंगोले, प.स. सदस्य विश्वास गायकवाड, प.स सदस्य राजेंद्र मेटकरी, युवक नेते संजय मेटकरी, प्रा. संजय देशमुख, मा. नगरसेवक सोमनाथ गुळमीरे, युवा नेते सागर पाटील, युवानेते अभिजीत नलवडे, दत्ता सावंत, चंद्रकांत जांभळे उपस्थित होते.


     अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षामध्ये निष्ठेने व कट्टर भावनेने कार्य करून ही जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने  चिंचोली येथील शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हातामध्ये शिवबंधन बांधले.


 यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती मासाळ, नामदेव खांडेकर, विकास सेवा सोसायटीचे संचालक आनंदा मासाळ, समाधान शेजाळ, राष्ट्रीय खेळाडू अमित शेजाळ, अभिनेता विजय गायकवाड, राजमाता उद्योग समूहाचे संस्थापक विशाल शेजाळ, तुकाराम हजारे, गणेश कदम, राजू गायकवाड, हनमंत खांडेकर, गोरख खरात, बाजीराव टकले, सिद्धेश्वर हजारे, विलास मासाळ,  मच्छिंद्र बेहेरे, बाबासो चव्हाण, संतोष मासाळ, सुनील इंगोले, बीरा टकले, नाथजी हजारे, दगडू कदम, अर्जुन शेजाळ, शहाजी शेजाळ, नामदेव हजारे, प्रकाश भोसले, समाधान नागणे, 


सुभाष टकले, काशिलिंग हजारे, बापू चोरमले, सोमनाथ बाबर, शंकर खांडेकर, विठ्ठल सरगर, बिरा मासाळ, दत्तात्रय हजारे, संभाजी गीड्डे, सावबा खांडेकर, संदीप गीड्डे, शिवाजी गडदे, राजाराम गडदे, अजय गडदे, तानाजी खरात, दत्ता घाडगे, सुधीर माळी, राजू येडगे, मेघराज इंगळे, त्याचप्रमाणे एखतपुर येथील सदाशिव नवले, रमेश खांडेकर, महादेव इंगोले, भारत इंगोले अशा असंख्य कार्यकर्त्यांनी शेकाप पक्षालाअखेरचा रामराम ठोकत शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.


        गेल्या अनेक वर्षांपासून चिंचोली परिसरातील शेकाप पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व नागरिक संपर्कात होते. ज्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हातात बांधले आहे. या कार्यकर्त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सदैव बांधील राहू व सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये सन्मानाची वागणूक व आदराचे स्थान दिले जाईल. ज्या अपेक्षेने कार्यकर्ते पक्षात सामील झाले आहेत. त्या कोणत्याही कार्यकर्त्याचा आपल्याकडून कधीही अपेक्षाभंग होणार नाही. असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments