विज्ञान महाविद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना संस्थासचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर ,प्राचार्य डॉ रघुनाथ फुले, डॉ दीपक रिटे , प्रा. अशोक वाकडे प्रा. इंगळे सर ,प्रा. राऊत सर ,खरात सर उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अविनाश लोखंडे यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाबासाहेब शंकर रेड्डी यांनी डॉ आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये असलेल्या योगदान त्यांनी स्पष्ट केले,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून भारतातील मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणले त्याचबरोबर "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा मूलमंत्र दिला,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय नागरिकाला संविधानातून दिलेल्या मतदानाचा अधिकार
आपण पूर्ण होकारार्थी वापरला पाहिजे असे संबोधले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ रघुनाथ फुले यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन करताना जातीव्यवस्था हे भारतीय समाजाला लागलेली कीड आहे त्यापासून आपण अलिप्त राहिले पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थीनि दैनंदिन जीवन जगत असताना दररोज स्वतः साठी वेळ काढून आत्मपरीक्षण केले पाहिजे असे आव्हान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक वाकडे तर आभार प्रा. अतुल बाबर यांनी मानले

0 Comments