google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विज्ञान महाविद्यालयात दिव्यांग दिन साजरा

Breaking News

सांगोला विज्ञान महाविद्यालयात दिव्यांग दिन साजरा

  सांगोला विज्ञान महाविद्यालयात दिव्यांग दिन साजरा


        विज्ञान महाविद्यालय सांगोला येते अपंग सहाय्यता दिन व दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी यांचा सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था सचिव मा विठ्ठल राव शिंदे मा संस्था सदस्य जाणकर मामा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा डॉ रघुनाथ राव फुले प्रा डॉ दीपक रिटे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांनी केलेल्या कार्याला प्रेरणा व चालना दिल्ली



            कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजीराव शिंदे यांनी जगामध्ये एकूण असणाऱ्या दिव्यांगांच्या संख्येची आकडेवारी देऊन त्या दिव्यांगांना अपंगांना सहाय्य करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले जागतिक आकडेवारी नुसार दिव्यांगा ची संख्या ही मोठी असून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी समाजाने विद्यार्थ्यांनी कटिबद्ध असले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव मा विठ्ठल राव शिंदे म्हणाले की महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी शारीरिक व मानसिक विकलांग अवस्थेत आहेत त्यांच्या घरापर्यंत जाऊन गावापर्यंत जाऊन त्यांना अर्थसाह्य करणं त्यांना मदत करणे आपलं महत्वाचं काम आहे आपण अपंग आहोत दिव्यांग आहोत ही भावना अपंग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होऊ देता कामा नये आपणही चांगलं काम करू शकतो तो इतरांसारखे जगू शकतो वागू शकतो असा आत्मविश्वास शिक्षक विद्यार्थी यांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संस्था महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करेल


           महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ रघुनाथ राव फुले म्हणाले की ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडी-अडचणी समस्या महाविद्यालय तर सोडवते पण शारीरिक व मानसिक विकलांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना व व्यक्तींना महाविद्यालय नेहमीच मदतीचा हात देत असते इथून पुढेही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व स्कॉलरशिप व विशेष अशा सवलती देण्यासाठी काठी संस्थान व महाविद्यालय प्रयत्नशील असेल असे स्पष्ट केले


             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नियोजित व अनियोजित समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक रिटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा अशोक वाकडे यांनी मानले दिव्यांग दिनाच्या सत्काराला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक बाळकृष्ण कोकरे बाबासाहेब गावडे विलास खुळे प्रा कैलास सगरे उपस्थित होते कार्यक्रमाला स्वप्नील शिंदे लोखंडे सर आबासाहेब इंगोले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments