google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न ; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार

Breaking News

धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न ; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार

 धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न ; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार


ठाणे :  ठाणे जिल्ह्यात  जावई आणि सासूच्या  नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील  ही घटना असून या ठिकाणी एका 27 वर्षाच्या जावयाने 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार केला आहे.आरोपी जावयाविरुद्ध  हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासूने तक्रार केल्याचे समजताच जावई पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सासू हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपी जावई हा उल्हासनगर  येथे राहतो. आरोपी जावई लग्नापूर्वी पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम करत होता. लाजेमुळे तो सासूशी लग्न करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने पीडित महिलेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. अशा परिस्थितीत दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं. याच दरम्यान ही घटना घडली असून सासूने जावयावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा  दाखल केला आहे.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रेमप्रकरणाचे प्रकरण आहे.त्याचबरोबर पीडितेच्या तक्रारीवरुन उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि कलम IPC 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.घटनेपासून आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतु त्याला लवकच बेड्या ठोकण्यात येतील असेही पोलिसांनी सांगितले.आरोपी जावयाला अटक केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले.

Post a Comment

0 Comments